Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोरात, ठाकरे भेट, चर्चा थेट, तरी कॉंग्रेस बीएमसी स्वबळावर?

भाई जगताप यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस महापालिका स्वबळावर लढणार, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या विषयावर भाष्य केलं आहे (Balasaheb Thorat on BMC election).

थोरात, ठाकरे भेट, चर्चा थेट, तरी कॉंग्रेस बीएमसी स्वबळावर?
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 5:53 PM

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC election) काँग्रेसने शड्डू ठोकला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मुंबईत नेतृत्वात बदल करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाई जगताप यांची पक्षाकडून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जगताप यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस महापालिका स्वबळावर लढणार अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या विषयावर भाष्य केलं आहे (Balasaheb Thorat on BMC election).

“मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप हे अॅग्रिसिव्ह नेते आहेत. पक्षाने मुंबईकरता दमदार टीम दिली आहे. आम्हाला शेवटी पूर्ण मुंबईत काम करायचं आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व 227 जागांवर तयारी करायची आहे. महाविकास आघाडीचं काय करायचे ते पुढे बघता येईल. पण आम्ही तयारी सुरु केली आहे. आमचा एक नंबर शत्रू भाजप आहे. आम्ही 227 जागा लढण्साची तयारी सुरु करत आहोत”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

“आम्ही वेगळी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीत समस्या येणार नाही. माझी जबाबदारी 227 वॉर्डमध्ये तयारी करण्याची आहे”, अशी भूमिका भाई जगताप यांनी मांडली (Balasaheb Thorat on BMC election).

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं म्हणजे त्याचा काही वेगळा अर्थ समजण्याचं कारण नाही. हा एक पत्ररुपी संवाद आहे. आमची आघाडी भक्कम आहे. आम्ही एकत्रपणे काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आम्हाला ज्याप्रकारे मार्गदर्शन करतात, अगदी त्याचप्रमाणे सोनिया गांधी देखील आम्हाला मार्गदर्शन करतात. फरक फक्त एवढाच की, भेटीगाठी होत नाही. त्यांनी पत्ररुपाने संवाद साधलाय”, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

“किमान समान कार्यक्रम हा तिघांचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम एकत्र तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे काही कार्यक्रम होत आहेत ते तिघांमुळे होत आहेत. प्रत्येकजण त्याच्या यशाचा वाटेकरी आहे. काँग्रेसचंही त्यात श्रेय आहे”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या : 

मुंबई महापालिकेची निवडणूक कशी लढणार?, सुप्रिया सुळे म्हणतात…

मुंबई कुणाची ? गायकवाड, जगताप की आणखी कोण ?