निकालानंतर ठाकरे गटाची बॅनरबाजी, पोस्टरवर पक्षप्रमुखाऐवजी हे पद…म्हणजेच निकाल मान्य केल्याची रंगली चर्चा

uddhav thackeray | कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला देखील आहे. त्याठिकाणी येऊन उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निकालानंतर ठाकरे गटाची बॅनरबाजी, पोस्टरवर पक्षप्रमुखाऐवजी हे पद...म्हणजेच निकाल मान्य केल्याची रंगली चर्चा
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 12:55 PM

सुनील जाधव, ठाणे, दि. 11 जानेवारी 2024 | शिवसेनेसंदर्भात १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या निकालात शिवसेनेची २०१८ मधील घटना अमान्य केली. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड अमान्य करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु झाली आहे. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात या निकालास आव्हान देण्यात येणार आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या सासुरवाडीत लागलेल्या बॅनरवरुन चर्चा रंगली आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख पक्षप्रमुख ऐवजी कुटुंबप्रमुख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून हे बॅनर लावण्यात आले आहे.

शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे यांचीच, असा निकाल दिला आहे. या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली सासुरवाडी डोंबिवली येथे येणार आहेत. उद्धव ठाकरे हे संपर्क दौऱ्यानिमित कल्याण लोकसभा मतदान क्षेत्रात शनिवारी येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शिवसेना ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर उद्धव यांचा कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे निकाल मान्य केल्याची चर्चा रंगली आहे.

लोकसभेच्या तयारीसाठी दौरा

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. शिवाय शिवसेनेचा बालेकिल्ला देखील आहे. या लोकसभा मतदार संघासाठी एकीकडे भाजप प्रयत्न करत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाकडून हा लोकसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसैनिकांना भाषणाची उत्सुक्ता

डोंबिवलीमधील शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुक्ता आहे. ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे पहावे लागणार आहे. त्याच बरोबर ठाकरे यांची तोफ मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात धडाडणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.