‘उद्धव ठाकरे सोबत विश्वासघात, धोका देणारे सच्चे हिंदू नाहीत…’, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास विरोध करणाऱ्या शंकराचार्यांचा हल्ला
Swami Avimukteshwaranand Saraswati: मातोश्रीवर पोहचल्यानंतर शंकराचार्य यांचे स्वागत संपूर्ण ठाकरे परिवाराने केले. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे माहीत आहे. ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात?
Swami Avimukteshwaranand Saraswati: नेहमी वादात राहणारे उत्तराखंड ज्योतिष पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांची पादुका पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. यावेळी संपूर्ण ठाकरे परिवार आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठाला विरोध करुन शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद चर्चेत आले होते.
‘उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात करणारे हिंदू कसे?’
मातोश्रीवर पोहचल्यानंतर शंकराचार्य यांचे स्वागत संपूर्ण ठाकरे परिवाराने केले. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे माहीत आहे. ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात? त्यांनी विश्वासघात करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवले. परंतु महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यांना त्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय केले ते माहीत आहे.
विश्वासघात सहन करणारे हिंदू
जे विश्वासघात सहन करत आहे, ते हिंदू आहेत. कारण त्यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. राज्यातील संपूर्ण जनतेला या घटनेमुळे दु:ख झाले आहे. केदारनाथमधून 228 किलो सोने गायब झाले आहे. परंतु त्याची साधी चौकशी झालेली नाही. दिल्लीत प्रतिकात्मक केदारनाथ बांधण्याचा प्रयत्न होत आहे. हे चुकीचे आहे. शास्त्रांमध्ये १२ ज्योतिर्लिंग म्हटले आहे. त्याचा पत्ताही दिला आहे. केदारनाथ हिमालयात आहे. तुम्ही ते दिल्लीत कसे आणू शकतात? असा प्रश्न शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी विचारला.
नरेंद्र मोदी माझे शत्रू नाही…
अनंत अंबानी यांच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी त्यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे चरणस्पर्श करुन त्यांचे आशार्वाद घेतले. त्यावर बोलताना ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांना मी आशीर्वाद दिले आहे. ते माझे शत्रू नाही. जेव्हा ते चुकीच्या मार्गावर असतात, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो.
कोण आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध केला होता. मंदिराचे कळस पूर्ण झाले नसल्यामुळे शास्त्रांच्या दृष्टिने चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. सप्टेंबर 2022 मध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी समाधी घेण्यापूर्वी उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली होती.
हे ही वाचा
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस का केला होता विरोध