AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार; काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसचं बळ वाढलं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे आणि काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी मोठं विधान केलं आहे. (Bhaskarrao Patil Khatgaonkar big reaction after degloor-biloli assembly bye election)

अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार; काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान
ashok chavan
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 8:02 PM
Share

नांदेड: देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसचं बळ वाढलं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे आणि काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी मोठं विधान केलं आहे. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असं भास्करराव पाटील खतगावकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विजयातून अशोक चव्हाण यांचं कुशल नेतृत्व दिसून येतं. चव्हाण यांच्या नेतृत्वामुळेच हे यश मिळू शकलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना आम्हाला पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे. जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत, असं खतगावकर यांनी म्हटलं आहे.

बाजारू उमेदवार घेतल्यावर…

दरम्यान, या निकालानंतर शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी अत्यंत खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाजारू सणवार साजरे करणारे उमेदवार घेतले की असे फटाके फुटतात आणि स्वतःच फुसका बार होतो, असा टोला निलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. सरकारने खोटा प्रचार करून निवडून आणण्याचा डाव खोडून काढला. या विजयामुळे आमची दिवाळी तेजाने उजळली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगल काम केलं आहे, असंही त्या म्हणाल्या.

भाजपने खालची पातळी गाठली

अशोक चव्हाण यांनीही या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. हा विजय लोकांचा विजय आहे. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईला लोकांची नेहमीच साथ मिळालेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्वीपेक्षा या वेळेला जास्त मतदान मिळालं. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे, असं चव्हाण म्हणाले.

आघाडीची ताकद वाढली, आकडाच सांगतो

जितेश अंतापूरकर यांच्या विजयाने आघाडीची ताकद वाढल्याचंही दिसून येत आहे. जितेश अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 789 मते मिळाली. तर भाजप उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले यांनी 11 हजार 347 मते घेतली. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. यावरून महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे.

संबंधित बातम्या:

Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लोष

मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव

वेतनवाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार, कामावर या; अनिल परबांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

(Bhaskarrao Patil Khatgaonkar big reaction after degloor-biloli assembly bye election)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.