Bhushan Gagrani : नवे सरकार नवे प्रशासन! अतिरिक्त मुख्य सचिवपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती
New Additional Chief Secretary : भूषण गगराणी यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई: राज्यातील सत्तातरानंतर आता प्रशासकीय विभागातही बदल होताना दिसत आहेत. भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी आता गगराणी यांच्या खांद्यांवर असेल. राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन केवळ 21 दिवस झालेले असताना आता प्रशासकीय विभागातही मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. आशिष कुमार सिंग (Ashish Kumar Singh) यांच्या जागी आता गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गगराणी यांनी याआधी उद्योग, सार्वजनिक आरोग्य, एमआयडीसी, राज्य पर्यटन विकास महामंडळ, सिडको आणि एमएसआरडीसी या खात्यांमध्ये काम केलं आहे. गगराणी यांच्या नियुक्तीनंतर आता प्रशकीय विभागात आणखी काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गगराणी अतिरिक्त मुख्य सचिव
भूषण गगराणी यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी आता गगराणी यांच्या खांद्यांवर असेल. राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन केवळ 21 दिवस झालेले असताना आता प्रशासकीय विभागातही मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. आशिष कुमार सिंग यांच्या जागी आता गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंदर्भातील आदेश काढले. गगराणी यांनी तातडीने पदभार स्विकारावा अश्या सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.
भूषण गगराणी हे 1990 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत युपीएससी परिक्षा पास होत ते अधिकारी झाले. त्यांनी राज्याच्या विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकारी म्हणून काम केलंय. सध्या अप्पर मुख्य सचिव नगरविकास, मराठी भाषा विभाग व जलसंपदा विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यांच्याकडील हा कार्यभार कायम ठेवून अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारीही त्यांना देण्यात आली आहे.