Ratan Tata House Photos : रतन टाटा यांचे घर पहिले का? काय आहेत सुविधा जाणून घ्या?
रतन टाटा यांनी आपली देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा साधेपणा अन् नम्रपणाची चर्चा नेहमी होत असते. रतन टाटा यांचे घर कसे असणार? याबद्दल उत्सुकता असते. रतन टाटा यांचा तीन मजली बंगला आहे. त्यातील पूजा घरात नैसर्गिक प्रकाश आहे.
मुंबई : देशातील नामांकीत उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या साधेपणा आणि नम्रतेमुळे वेगळी ओळख आहे.भारतातील सर्वात मोठ्या देणगीदारांमध्ये रतन टाटा त्यांचे नाव आहे. ते त्यांच्या राध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात, मात्र रतन टाटा यांना काही गोष्टींची खूप आवड आहे.
Ratan Tata home
रतन टाटा यांचे मुंबईच्या कुलाबा भागात 13,500 स्क्वेअर फुटाचा आलिशान बंगला आहे. या आलिशान घराची किंमत जवळपास 150 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. एखाद्या हवेलीसारख्या या घरात अनेक खोल्या, जिम, स्विमिंग पूल, सन डेक, बार, लाउंज यासह सर्व सुविधा आहेत.
रतन टाटा यांच्या घर तीन मजली आहेत. त्याचे सात लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एका मजल्यावर दोन भाग आहे.
Ratan Tata Home
पहिल्या मजल्यावर मोठे सन डेक आहे. या मजल्यावर दोन बेडरुम आहे. एक स्टडी रुम आहे. सन डेकमध्ये एकावेळी ५० ते ६० जण बसू शकतात.
Ratan Tata Home
दुसऱ्या मजल्यावर तीन बेडरुम आहेत. एक लिव्हिंग रुम आणि लायब्ररी आहे. त्यांच्या बंगल्याचा रंग पांढरा आहे. बाहेरुन हा बंगला खूप सुंदर दिसतो. तितकाच आतून सुंदर आहे.
Ratan Tata Home
तिसऱ्या मजल्यावर मीडिया रुम आहे. एक जिम व बेडरुम आहे. या मजल्याच्या दुसऱ्या भागात स्विमिंग पूल आणि एक सन डेक आहे.
Ratan Tata Home
रतन टाटा यांच्या बंगल्याच्या बेसमेंटमध्ये कर्मचाऱ्यांसाठी घर आहे. तसेच या ठिकाणी दहा ते बारा कार पार्क होऊ शकतात, इतकी मोठी जागा आहे. रतन टाटा यांचा पूजा घरात नैसर्गिक प्रकाश येतो. तसेच बंगल्यावरुन समुद्राचा सुंदर देखावा देऊ शकतो.