उद्धव ठाकरे यांचा भाजपला सर्वात मोठा झटका, माजी मंत्र्यांशी रक्ताचं नातं असलेल्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाने भाजपला सर्वात मोठा झटका दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका माजी मंत्र्याशी रक्ताचं नातं असलेल्या नेत्याने ठाकरे गटात प्रवेश केलाय.

उद्धव ठाकरे यांचा भाजपला सर्वात मोठा झटका, माजी मंत्र्यांशी रक्ताचं नातं असलेल्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 6:16 PM

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजू शकतं. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुका आणि राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी काळ हा विरोधकांसाठी जास्त महत्त्वाचा आहे. कारण दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडलेली आहे. असं असताना शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधारी भाजपला मोठा झटका दिला आहे. कारण ठाकरे गटाने भाजपच्या एका माजी मंत्र्याचं रक्ताचं नातं असलेल्या एका बड्या नेत्याला फोडलं आहे. या नेत्याचा आज ठाकरे गटात जाहीर प्रवेश झालाय.

ठाकरे गटाने भाजपला अहमदनगर जिल्ह्यात मोठा झटका दिला आहे. ठाकरे गटाने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे बबनराव पाचपुते यांना मोठा राजकीय झटका बसल्याचं मानलं जात आहे. साजन पाचपुते आज आपली आई आणि इतर कुटुंबियांसह 250 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले.

साजन पाचपुते आपल्या ताफ्यासह उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. इथे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत साजन राजपुते यांच्या जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी साजन पाचपुते यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी साजन पाचपुते यांना मोठं पद दिलं. उद्धव ठाकरेंनी साजन पाचपुते यांना पक्षाच्या उपनेते पदाची जबाबदारी दिली.

‘अनेकांच्या पोटामध्ये गोळा येणं स्वभाविक’

“तुम्हाला काही सांगायची आवश्यकता नाही. कारण तुम्ही निश्चय करुनच मातोश्रीमध्ये आला आहात. मातोश्रीमध्ये म्हणजे आपल्या शिवसेना परिवारात आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मला आनंद आहे की, अभिमान आहे की, सहकुटुंब आणि सहपरिवार शिवसेनेत आले आहेत. हा सहपरिवार माझ्या शिवसेना परिवारात आला आहे. याचाच अर्थ माझा परिवार आता वाढतोय”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“अनेकांच्या पोटामध्ये गोळा येणं स्वभाविक आहे आणि तो यायलाच पाहिजे. तो आला नाही तर मग आपला काय उपयोग? अनेकांचे डोळे पांढरे झालेच पाहिजेत. पण ते पांढरे झाले नाहीत तर आपला काय उपयोग? त्या पांढऱ्या डोळ्यांना आपल्याला भगव्याचं तेज दाखवायचं आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?

“राजकारणात एक पद्धत आहे. सत्तेच्या दिशेला सगळे जातात. आजसुद्धा तेच चाललं आहे. पण हा एक लढवय्या आहे जो सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आला आहे. तिकडे खूप जण आहेत. आता एवढे जण झाले आहेत की त्यांनाच कळत नाही की, माझा कुणाला म्हणू? सगळे उपरे, आयाराम एकमेकांच्या डोक्यावर बसले आहेत. काय होणार आहे त्याची त्यांनाच कल्पना आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“साजन तुम्ही शिवसेनेत आलात. मी तुम्हाला असाच लटकवणार नाही. कारण मी आईंना सांगितलंय की, साजन यांची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला जबाबदारी दिली तर पेलणार का? साजन नुसतं श्रीगोंधापुरता मर्यादित राहायचं नाही. पूर्ण अहमदनगर आहे, ज्या ज्या वेळेला मला वाटेल त्यावेळेला तुम्हाला महाराष्ट्र पिंजून काढावं लागेल. कारण नवं नेतृत्व आपल्याला तयार करायचं आहे”,  असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“ही जबाबदारी पेलण्याची ताकद तुमच्यात आहे. त्यामुळे मी तुम्हाला शिवसेनेचं उपनेतेपद देतो आहे. मी थोडे दिवस बघणार, साजन फिरतोय की नाही? साजन एकटा नाहीय, परिवार कशाला आहे मग? आपल्याला सर्व महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. हा सोहळा आनंदाचा नक्कीच आहे”, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.