विधान परिषदेच्या पहिला निकाल समोर, नेमकं कोण जिंकलं? कोणकोण आघाडीवर?
विधान परिषदेचा पहिला निकाल आता समोर आला आहे. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा पहिला निकाल आता समोर आलाय.
विधान परिषदेचा पहिला निकाल आता समोर आला आहे. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा पहिला निकाल आता समोर आलाय. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर हे 23 मतांचा कोटा पूर्ण करत विजयी झाले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचा पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लागला आहे. योगेश टिळेकर हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून जिंकून आले होते. ते हडपर विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले होते. त्याआधी ते पुणे महापालिकेत नगरसेवक होते. योगेश टिळेकर यांच्यावर पक्षांतर्गत अनेक जबाबदाऱ्या पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. त्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या. यानंतर त्यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत योगेश टिळेकर यांचा विजय झाला.
या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचादेखील विजय झाला आहे. योगेश टिळेकर यांच्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या विजयी ठरल्या. त्यानंतर भाजपचेच उमेदवार परिणय फुके हे विजयी झाल्याची तिसरी बातमी आली. भाजपकडे 103 मतं असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांचा विजय होणं हे साहजिक आहे.
भाजपच्या पाचव्या उमेदवारासाठी चुरस असणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनादेखील या निवडणुकीत चांगलं यश मिळाले आहे. ठाकरे गटाचे हक्काचे केवळ 16 मते होती. असं असताना त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. या निवडणुकीत महायुतीने 12 वा उमेदवार दिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. अखेर आता निकाल समोर येतोय.
नेमका निकाल काय?
- या निवडणुकीचा पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लागला. भाजपचे योगेश टिळेकर यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचादेखील विजय झाला आहे. योगेश टिळेकर यांच्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या विजयी ठरल्या. त्यानंतर भाजपचेच उमेदवार परिणय फुके हे विजयी झाल्याची तिसरी बातमी आली.
- या निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार जिंकून आले आहेत. तर भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांचा निकाल रखडला होता.
- अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत.
- ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचाही विजय जवळपास निश्चित आहे.
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात चुरस रंगल्याचं बघायला मिळालं. पण अखेर सदाभाऊ खोत यांचा विजय समोर आला. त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवाराता पराभव झाल्याचं स्पष्ट झालं.
विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार
- 1) पंकजा मुंडे
- 2) परिणय फुके
- 3) सदाभाऊ खोत
- 4) अमित गोरखे
- 5) योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
- 1) शिवाजीराव गर्जे
- 2) राजेश विटेकर
शिवसेना
- 1) कृपाल तुमाने
- 2) भावना गवळी
शिवसेना ठाकरे गट
- 1) मिलिंद नार्वेकर
शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार
- 1) जयंत पाटील (शेकाप)
काँग्रेस
- 1) प्रज्ञा सातव