Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पुन्हा वातावरण तापलं! आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात राडा, नेमकं काय घडलं?

मुंबईत भाजप युवा मोर्चानं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयावर हल्ला केला. पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आझाद मैदान पोलीस ठाण्याजवळ एकत्र आले आणि घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमुळे मोठा गोंधळ झाला आणि पोलीस ठाण्याचा गेट बंद करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मुंबईत पुन्हा वातावरण तापलं! आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात राडा, नेमकं काय घडलं?
आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात राडा, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 7:51 PM

मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात घुसण्याचा आणि कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलक भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे या घटनेनंतर काँग्रेसदेखील आक्रमक होताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करत असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांकडून आंदोलन करण्यात आलं. तर आता काँग्रेसकडूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत भाजपवर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे काँग्रेस कार्यालय परिसरात झालेल्या गदारोळानंतर आता मुंबईत आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर मोठा गोंधळ बघायला मिळाला.

आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्ते आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर जमले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसकडून भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर भाजप कार्यकर्तेदेखील आक्रमक होताना दिसले. आझाद मैदान पोलीस ठाण्यात भाजपच्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तापलं.

पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना बाहेर काढलं, काँग्रेस कार्यकर्तेही ताब्यात

आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्ते जमा झाले. यावेळी स्थानिक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात थांबू नये, असे निर्देश स्थानिक डीसीपींनी दिला. भाजप कार्यकर्त्यांनी मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना आणि इतर भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये नेण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस ठाण्याचा गेट बंद, बाहेर कडेकोट बंदोबस्त

आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात हंगामा बघायला मिळाला. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी पोलीस ठाण्याचा गेट बंद केला. तसेच पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून सर्व घटनेकडे बारकाईने लक्ष आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.

पोलीस काँग्रेस कार्यालयात दाखल

दरम्यान, काँग्रेस कार्यालयात घडलेल्या घटनेप्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे. पोलीस चौकशीसाठी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात दाखल झाले आहेत. पोलिसांकडून काँग्रेस कार्यालयावरील हल्ला आणि तोडफोडीची सखोल तपास सुरु आहे.

धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....