BIG BREAKING | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी?, आम्हाला सापत्न वागणूक मिळतेय; गजानन कीर्तिकर यांचा गंभीर आरोप

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी फार मोठं विधान केलं आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप कीर्तिकर यांनी केला आहे. कीर्तिकर यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

BIG BREAKING | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी?, आम्हाला सापत्न वागणूक मिळतेय; गजानन कीर्तिकर यांचा गंभीर आरोप
gajanan kirtikarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 1:04 PM

मुंबई : शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आमच्यात एकोपा आहे, असं दोन्ही गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, असं असलं तरी शिंदे गट आणि भाजपमध्ये एक वाक्यता नाही. दोनन्ही पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचं उघड झालं आहे. खुद्द शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हे गुपित उघड केलं आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोपच गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मी खंत व्यक्त केली नव्हती तर माहिती दिली होती. आम्ही सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही 13 खासदार आहोत. आम्ही एनडीएचे घटक आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचे घटक नव्हतो. आम्ही एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे त्या पद्धतीने आमची कामे झाली पाहिजे. घटक पक्षाला महत्त्व दिलं पाहिजे. पण दिलं जात नाही असं आमचं म्हणणं आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे, असा गंभीर आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

22 जागा लढणार

शिंदे गटाने 22 जागांवर दावा केला आहे काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या 22 जागा आहेत. दावा कशाला केला पाहिजे? 2019ला आम्ही एकत्र लढलो. तेव्हा भाजपने 26 जागा घेतल्या होत्या. त्यावेळी भाजपचे तीन उमेदवार पडले. त्यांचे 23 खासदार निवडून आले. शिवसेनेच्या 22 जागा होत्या. त्यावेळी आमचे 18 खासदार निवडून आले होते. त्यातील चार उमेदवार पडले. त्यामुळे आम्ही 22 जागा लढणार आहोत. 22 जागा लढण्याची आमची तयारी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राऊत मनोरंजन करतात

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकाही केली. राऊत रोज मनोरंज करत आहेत. घरात बसल्या बसल्या मनोरंजन होत आहे. आम्ही त्यांना गंभीरपणे घेत नाही. हे घर बसल्या लोकांच्या मनोरंजनाचं साधन झालं आहे. त्यांच्या म्हणण्याचा काहीच अर्थ नाही. संजय राऊत नुसते कोट्या करतात, अशी टीका त्यांनी केली.

शक्यता नाही

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का? या प्रश्नावर कीर्तिकर यांनी नाही असं उत्तर दिलं. ठाकरे-शिंदे एकत्र यावेत हे आम्ही फार पूर्वीच बोललो होतो. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत बोललो होतो. शिंदेंनी तडजोड करण्यासही त्यांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. पण आता ते संपलं. आता दोघे एकत्र येण्याची शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.