Devendra Fadnavis Rally: औरंगाबादमध्ये राज ठाकरे, तर मुंबईत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला घेरणार; भाजपची रविवारी बुस्टर डोस सभा

Devendra Fadnavis Rally: आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन या सभेची माहिती दिली.

Devendra Fadnavis Rally: औरंगाबादमध्ये राज ठाकरे, तर मुंबईत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला घेरणार; भाजपची रविवारी बुस्टर डोस सभा
औरंगाबादमध्ये राज ठाकरे, तर मुंबईत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला घेरणार; भाजपची रविवारी बुस्टर डोस सभाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 11:54 AM

मुंबई: एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेतून राज ठाकरे महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) घेरणार आहेत. तर, दुसरीकडे त्याच दिवशी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची मुंबईत अतिविराट सभा पार पडणार आहे. भाजपने या सभेला बुस्टर डोस सभा असं टायटलं दिलं आहे. या सभेतून शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची पोलखोल करण्यात येणार आहे. या सभेतून भाजप कार्यकर्त्यांना बुस्टर देण्यात येणार आहे. तर विरोधकांना डोस देण्यात येणार असल्याचं भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपच्या या सभेतून आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याशिवाय या सभेतून भाजप महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन या सभेची माहिती दिली. महाराष्ट्रात दिनानिमित्त एक रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. कोरोना नंतर केवळ भाजपने एवढा मोठा आणि रंगाने भरलेला सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा आयोजित केला आहे. येत्या 1 मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुंबईतील बुथ प्रमुख, हजारो कार्यकर्ते मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर उत्साहात आणि आनंदात येणार आहेत. या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची बुस्टर डोस सभा होणार आहे. या सभेतून कार्यकर्त्यांना बुस्टर आणि शिवसेनेसहीत महाविकास आघाडीला कडकडीत डोस देण्यात येणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.

शिवसेनेची पोलखोल करू

गेल्या काही दिवसात काळोखात मेट्रोच्या कारशेडच्या पत्र्याच्या मागे लपून एक दोन लोकं एकत्रं येऊन दगड मारण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या पोलखोल सभेला घाबरून हे कृत्य केलं जात आहे. शिवसेनेचे कर्मकांड आम्ही जनतेसमोर आणले. काही लोक 14 मे रोजी सभा घेणार आहेत. कोणी 30 मे रोजी सभा घेणार आहेत. तर कोणी 1 मे रोजीच सभा घेत आहे. मात्र, भाजपची 1 मे रोजीची पोलखोल सभा सर्वात मोठी असणार आहे. या सभेतून देवेंद्र फडणवीस विरोधकांना डोस देतील. तसेच शिवसेनेची आम्ही पूर्णपणे पोलखोल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज ठाकरेंची तोफ धडाडणार

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होत आहे. राज यांनी भोंग्यांचा विषय हातात घेतल्याने ते या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....