शिवसेनेने तोफ डागण्यापूर्वीच चंद्रकांत पाटील आणि सोमय्या दिल्लीकडे रवाना; राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा धमाका करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर प्रचंड राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेनेने तोफ डागण्यापूर्वीच चंद्रकांत पाटील आणि सोमय्या दिल्लीकडे रवाना; राजकीय घडामोडींना प्रचंड वेग
शिवसेनेने तोफ डागण्यापूर्वीच चंद्रकांत पाटील आणि सोमय्या दिल्लीकडे रवाना; राजकीय घडामोडींना प्रचंड वेग
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 3:22 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा धमाका करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर प्रचंड राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या (bjp) साडेतीन लोकांची नावे जाहीर करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पण या नेत्यांची कोणत्या संदर्भात पोलखोल करणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं. पण संजय राऊत यांच्या गर्भित इशाऱ्यानंतर भाजपच्या तंबूत चांगलीच खळबळ उडालेली दिसत आहे. राऊत यांच्या पीसीला अवघे दोन तास बाकी असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. आम्हाला अटक करून दाखवा असं जाहीर आव्हान देणारे हे दोन्ही नेते अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

संजय राऊत हे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमधूनही शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेना भवना समोर दाखल झाले आहेत. बर्दाश्त बहोत किया अब बर्बाद करेंगे असं राऊतांनी सुनावलं होतं. त्यामुळे राऊत यांच्या पीसीपूर्वीच भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत काय बोलणार मला माहीत नाही. त्यांच्या मनातील मला ओळखता येत नाही, असं म्हटलं होतं. तेच पाटील आज दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी अचानक दिल्लीला रवाना झाले. तर मला अटक करून दाखवा, मी बसलेलोच आहे. माझी बॅग भरलेलीच आहे. मी कुणाला घाबरत नाही, असं पुण्यातील पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगणारे किरीट सोमय्याही सायंकाळी 5 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेते अचानक दिल्लीत गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

जेपी नड्डा, शहांना भेटणार?

दिल्ली भेटीत चंद्रकांत पाटील आणि सोमय्या हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राऊत यांनी राज्यातील किंवा केंद्रातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यास पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन हे दोन्ही नेते दिल्लीतील नेत्यांकडून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पाटील आणि सोमय्या यांच्या या दिल्लीवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut vs BJP LIVE Updates : मुंबईत राऊतांचं रणशिंंग, भाजप नेत्यांची दिल्ली वारी

Maharashtra News Live Update : सिंधुदुर्गात भाजपात मोठी दुफळी, निवडणुकीनंतर मोठा झटका

राऊत रोज बडबडतात, ‘चोर की दाढ़ी में चूगार’ – नवनीत राणा

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.