‘नागपूरचा कलंक’ | उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘कलंकीचा काविळ’ म्हणून उत्तर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'नागपूरचा कलंक' अशा शब्दाचा उल्लेख केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'नागपूरचा कलंक' | उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 'कलंकीचा काविळ' म्हणून उत्तर
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 9:23 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांची आज नागपुरात सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. या ऑडिओ क्लिपमध्ये ते भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीच सत्ता स्थापन करणार नाही. एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं फडणवीस या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाले आहेत. ही ऑडिओ क्लिप काही वर्षांआधीची आहे. पण ती सध्या व्हायरल होतेय. ही क्लिप उद्धव ठाकरे यांनी ऐकवून दाखवत “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा”, अशा खोचक शब्दांत टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे. या व्हिडीओत उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. “काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्या गुरांचं शेणसुद्धा खाल्लं होतं. त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता. टॉयलेटमधील पेपर खालले, शेण खाल्लं”, असं उद्धव ठाकरे या व्हिडीओत म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

“शरद पवार यांची राजकीय कारकीर्द कशी सुरु झाली ते मी सांगतो, त्यांनी स्वत:च्याच मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करुन यांनी पुलोद काढली. का? मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बाकी गेलं खड्ड्यात. त्यानंतर त्यांनी राजीव गांधींसोबत द्रोह केला”, अशी टीका उद्धव ठाकरे या व्हिडीओत करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधलाय. ‘कलंकीचा काविळ’, असं शिर्षक देऊन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!  आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक.  सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का? असे विचारणे, याला म्हणतात कलंक”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी”, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.