Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक, किरीट सोमय्या यांची माहिती

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलीय, त्याआधी कदम यांची सलग चार तास चौकशी करण्यात आली.

मोठी बातमी! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक, किरीट सोमय्या यांची माहिती
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 10:52 PM

मुंबई : शिंदे गटाचे तडफदार नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे भाऊ सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीदेखील आता बॅग भरुन तयार राहावं, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ‘संबंधित प्रकरणात 100हून अधिक कोटींचा घोटाळा झालाय. इतके पैसे आले कुठून?’, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. दापोली रिसॉर्टप्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केलीय. विशेष म्हणजे त्याआधी मुंबईत सदानंद कदम यांची ईडीकडून तब्बल चार तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सदानंद कदम हे अनिल परबांचे निकटवर्तीय आहेत.

सदानंद कदम यांना ईडीने अटक केलेली आहे. अनिल परब बॅग भरुन तयार राहा. शंभर कोटींचा घोटाळा आहे. पैसे आले कुठून? सचिन वाझेकडून की आरटीओ ट्रान्सफरने? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी आरोप करत आहेत. अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या नावाचा वापर करून डमी मालक उभा केला होता. त्यानंतर कदम यांच्या नावावर सर्व व्यवहार करून मालक म्हणून स्वत:ची ओळख लपवली होती, असा आरोप सोमय्यांचा आहे.

सदानंद कदम यांच्यासोबत दिवसभर काय-काय घडलं?

ईडीचे पथक आज सकाळी दापोलीतल्या कुठेशी गावात दाखल झालेलं. ईडीचे अधिकारी आज सकाळी सर्च ऑपरेशनसाठी कुठेशी गावात दाखल झालेलं. त्यानंतर या पथकाने सदानंद कदम यांची भेट घेतली. या पथकाने सदानंद कदम यांना चौकशीसाठी ईडी कार्यालात बोलावलं. त्यानंतर कदम ईडी कार्यालयात आले आणि त्यांची तब्बल चार तास चौकशी झाली आणि चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, सदानंद कदम यांनी आपली तब्येत बरी नसल्याने तसेच डॉक्टरांनी 24 मार्चपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला असल्याने आपली 23 मार्चनंतर चौकशी करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. पण ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती ऐकली नाही. तुम्ही आजच चौकशीला या असा आग्रह ईडी अधिकाऱ्यांनी धरला. त्यामुळे सदानंद कदम यांना ईडी कार्यालयात यावं लागलं.

सदानंद कदम यांच्या उजव्या खांद्यावरील गाठीची नुकतीच सर्जरी झालीय. खेडच्या डॉ. उपेंद्र तलाठी यांनी त्यांच्यावर सर्जरी केलीय. या सर्जरीनंतर सदानंद यांना डॉक्टर तलाठी यांनी 24 मार्चपर्यंत बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिलाय. याबाबत सदानंद कदम यांनी ईडी अधिकाऱ्यांना सकाळीच माहिती दिलेली. विशेष म्हणजे त्यांनी डॉक्टरांचे रिपोर्टही सादर केले. पण तरीही ईडी अधिकाऱ्यांनी आजच चौकशीचा आग्रह धरलेला.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.