‘शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही’, नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य

नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे हे आता अधिकृतपणे शिवसेनेचे कर्तेधर्ते आहेत. असं असताना त्यांच्याच मित्रपक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेनेचा उल्लेख करत मोठं विधान केलं.

'शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही', नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 5:52 PM

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह अधिकृतपणे मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष पुढे वाटचाल करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केलेली आहे. शिवसेनेचे 40 आमदार आहेत. असं असताना नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं वक्तव्य केलेलं आहे. शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

खरंतर नारायण राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली. पण टीका करताना त्यांनी ठाकरे गट असा उल्लेख न करता थेट शिवसेना संपली असल्याचं विधान केलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही म्हणजेच शिवसेना असा दावा करत असताना नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभा विराट नव्हती. त्या सभेत स्थानिक लोकं नव्हती. उद्धव ठाकरे काय बोलणार? त्यांना काय बोलता येतं? राज्याचा विकास, जनता, जनतेच्या प्रश्नाबद्दल काय बोलता येतं? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काही केलं नाही. ते आता बोलून लोकांना काय सांगणार आहेत? कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. काय दिलं कोकणाला? त्यामुळे बोलण्यासारखं काही नव्हतं”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

‘शिवसेना आता संपली’

“शिवसेना आता संपली आहे. काही राहिलेलं नाही. उरलेले 15 आमदारही त्यांच्या हातात राहणार नाही. पक्षाची वाताहत नाही तर यातायात झालेली आहे. उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात येण्याची ताकद नव्हती. तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का? उद्धव ठाकरेंना बोलताना त्रास होतो, 20 पावलं चालू शकत नाही. आणि तुम्ही उद्धव ठाकरेंचा घणाघात, अशी बातमी देता. वाघ दाखवायचा, अरे कशाला? ते वय राहिलेलं नाही आणि वयात काही करु शकले नाहीत”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

“शिवसेना जी घडली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी कुणाच्या कानफडातही मारलेली नाही. हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फिरले काय? ते लोकांमध्ये असे व्यक्ती नाही. लोकांमध्ये जावून प्रभावित होईल असे ते नाही. त्यामुळे ही आघाडी जनतेच्या मनातून बिघडलेली आहे. भास्कर जाधव कोण आहे? शिव्या दिल्या किंवा नाचून दाखवलं म्हणजे झालं का? तसं महाराष्ट्राच्या लोकांना अभिप्रेत नाही. अरे उद्धव कुणाचीही जीभ हासडतो, स्वत:ची जीभ सांभाळ. अशी पाळी आली. असा फिरत राहिलास तर ती पण जागेवर राहणार नाही”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.