‘एकत्र राहून संशयकल्लोळ, नाना पटोले खरंच भाजपला मिळाले?’, बड्या नेत्याचं महत्त्वाचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) एकटे पडले आहेत की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

'एकत्र राहून संशयकल्लोळ, नाना पटोले खरंच भाजपला मिळाले?', बड्या नेत्याचं महत्त्वाचं विधान
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 6:14 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) एकटे पडले आहेत की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून (BJP) देखील या मुद्द्यावर उघडपणे आता बोललं जातंय. महाविकास आघाडीत इतका संशयकल्लोळ सुरुय की नाना पटोले यांच्यावर आघाडीतील दिग्गज नेत्यांचा विश्वास आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय, अशी भूमिका आता भाजपच्या एका बड्या नेत्याने मांडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलंय.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची तक्रार केलीय.

नाना पटोले यांच्यासोबत काम करणं कठीण झाल्याचं थोरात यांनी पत्रात लिहिलं आहे. विशेष म्हणजे त्यानंतर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातही नाना पटोले यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असता, असा दावा ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात केलाय.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात मतभेद होताना दिसत आहेत. याच गोष्टीवर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आलीय.

प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?

“महाविकास आघाडीत एकत्र राहून संशयकल्लोळ कश्या पद्धतीने होता हे आता बाहेर येत आहे. बाळासाहेब थोरात यांची भूमिका ताजी असताना संजय राऊत असं बोलून त्या संशय कल्लोळात आणखी भर टाकत आहेत”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

“याचा अर्थ असा म्हणायचा आहे का की, नाना पटोले यांनी भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी केली. यांचा एकमेकांवर विश्वास नाही”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

“अजित पवार काय पोस्टमनचं काम करणारे होते का? तुम्ही उपमुख्यमंत्री होता. तुम्ही प्रयत्न का केला नाही? आता संशय तयार करणे योग्य नाही. सत्तेत असताना त्यांचं एकमेकांच्या विषयी काय होतं ते आता बाहेर येत आहे”, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी सुनावलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.