AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत मिठाचा खडा, ‘शरीर शिंदेंसोबत, आत्मा ठाकरेंसोबत’, भाजप नेत्याचा कीर्तिकरांवर निशाणा

गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीवरुन भाजपला घरचा आहेर दिल्यानंतर आता भाजप आमदार अमीत साटम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "कीर्तिकरांचं शरीर शिंदेंसोबत आणि आत्मा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आहे", अशी टीका अमीत साटम यांनी केली आहे.

महायुतीत मिठाचा खडा, 'शरीर शिंदेंसोबत, आत्मा ठाकरेंसोबत', भाजप नेत्याचा कीर्तिकरांवर निशाणा
महायुतीत मिठाचा खडा, 'शरीर शिंदेंसोबत, आत्मा ठाकरेंसोबत', भाजप नेत्याचा कीर्तिकरांवर निशाणा
| Updated on: Apr 12, 2024 | 7:00 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी ईडीच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे आता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांच्यामागे कथित कोविड खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. पण यावरुन गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर टीका केली आहे. “ईडीबद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचा प्रयोग करता कामा नये. आता ईडीचा वापर थांबवा, त्याला लोकं कंटाळली आहेत, चीड निर्माण झाली आहे”, असं स्पष्ट वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. कारण कीर्तिकर यांच्यावर भाजप आमदार अमीत साटम यांनी निशाणा साधला आहे. “कीर्तिकरांचं शरीर शिंदेंसोबत आणि आत्मा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आहे”, अशी टीका अमीत साटम यांनी केली आहे.

“असे वाटते की, गजानन कीर्तिकर यांचे शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे आणि आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आहे. एकदा त्यांनी ठरवावे की ते कुणाबरोबर आहेत. मोदींचा चेहरा वापरून भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर दोनदा खासदार झाले. ईडी पासून घाबरण्याची गरज भ्रष्टाचाऱ्यांना आहे. जर कर नाही तर डर कशाला? ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या अकाउंटमध्ये खिचडीच्या कंत्राटदाराकडून 95 लाख रुपये आलेच का? याचे उत्तर द्यावे! भ्रष्टाचारियो की खैर नही! कार्यवाही तो होगी ही”, अशी टीका अमीत साटम यांनी केली आहे.

गजानन कीर्तिकर नेमकं काय म्हणाले?

“अमोल आणि सूरजवर खिचडी घोटाळ्या संदर्भातील आरोपांचा राग येतो. कोरोना आला तेव्हा सर्व काही तात्काळ हवं होतं. तेव्हा पटापट गरज होती, तेव्हा पुष्कळसे व्हेंडर आले. त्यापैकी एक संजय माशेलकर आहेत. ते आमच्या शिवसेनेत आहेत, त्यांनी कंपनी स्थापन केली. त्यामध्ये अमोल किंवा सूरज भागीदार नाहीत, पण सप्लाय चेनमध्ये त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं. त्या कंपनीला प्रॉफिट झालं, त्यानंतर अमोल आणि सूरजला चेकने मानधन मिळालं. ते पैसे बँकेत टाकले, त्यावर इन्कम टॅक्सही लागला. यामध्ये मनी लाँड्रिंग नाही”, असं स्पष्ट वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केलं.

“मी आता उत्तर पश्चिमचा खासदार आहे निवडणूक लढत नाही हे जाहीर केलं आहे. उबाठा गटाचा उमेदवार अमोल कीर्तिकर आहे सर्वांना माहिती आहे. आमचा महायुतीचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा पूर्ण ताकद लावणार आहे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठीच काम करणार”, अशी देखील प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी केली. एकीकडे कीर्तिकर आपल्या मुलाविरोधातील कारवाईला विरोध करत आहेत. पण निवडणुकीत आपल्या मुलाच्या पराभवासाठीदेखील ते काम करणार असल्याचं म्हणत आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.