Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिसी ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार, आमदारास अटक

mla ganpat gaikwad firing | कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार केला. हा गोळीबार सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिसी ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार, आमदारास अटक
mla-ganpat-gaikwad-firing CCTV Fooatage
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 11:32 AM

सुनील जाधव, कल्याण दि.3 फेब्रुवारी 2024 | कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार केला. हा गोळीबार सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला. भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये असताना आमदाराने पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. आमदार गणपत गायकवाड असे भाजप आमदाराचे नाव आहे.

तिघांवर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा

उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीसांनी गोळीबार व हत्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. जागेच्या वादातून फायरींग केल्याची पोलिसांनी दिली. हत्या करण्याच्या उद्देशाने एकापाठी एक असे सहा राउंड फायर केले आहे. या प्रकरणात  महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सहा तासांपासून शस्त्रक्रिया

उल्हासनगरात भाजप आमदारांचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार झाल्यानंतर हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. गोळीबारात जखमी झालेले शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महेश गायकवाड यांच्यावर गेल्या सहा तासांपासून शस्त्रक्रिया सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे गेल्या सहा तासांपासून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ठाण मांडून बसले आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे वारंवार डॉक्टरांची विचारपूस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

काय होते प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागे वरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले. हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या. महेश गायकवाड यांच्यावर चार तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.