भाजप आमदाराचं वीजपंपासह विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन; वीजबिलही फाडलं

वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केलं आहे. (bjp mla ram satpute agitation against power bill at vidhan bhavan)

भाजप आमदाराचं वीजपंपासह विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन; वीजबिलही फाडलं
राम सातपुते, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 11:37 AM

मुंबई: वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केलं आहे. भाजप आमदार राम सातपुते तर थेट विधानभवनात कृषी पंप घेऊन आले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच त्यांनी वाढीव वीजबिल फाडून सरकारचा निषेध नोंदवला. सरकारने वीज कनेक्शन तोडणी न थांबविल्यास कृषीपंपच सरकारच्या डोक्यात हाणू, असा इशाराच त्यांनी दिला. (bjp mla ram satpute agitation against power bill at vidhan bhavan)

भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी आज अनोखे आंदोलन केलं. सातपुते यांनी अंगात निषेधाचा फलक असलेलं बॅनर घातलं. त्यानंतर मोटरसह कृषीपंप हातात घेऊन ते विधान भवन परिसरात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या वीज बिलाला माफी मिळालीच पाहिजे, वीज कापणी रद्द करा अशी मागणी सातपुते यांनी केली. यावेळी सातपुते यांनी वीजबिल फाडून सरकारचा निषेधही नोंदवला. सातपुते यांच्यासह भाजपच्या सर्वच आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.

विधानभवनाच्या पायरीवर ठिय्या

त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यावर जमले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राम सातपुते, अतुल भातखळकर यांच्यासह भाजपच्या सर्वच आमदारानी ठिय्या आंदोलन सुरू करून जोरजोरात घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सातपुते आणि भाजप आमदारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सातपुते यांना कृषीपंप घेऊन विधानभवनात जाण्यापासून रोखलं.

सरकारने सावकारी सुरू केलीय

यावेळी सातपुते यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारने अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. आता वसूलीसाठी शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. या सरकारनेही सावकारीच सुरू केली आहे, अशी टीका करतानाच वीज बिल माफ नाही केलं तर हा कृषीपंपच सरकारच्या डोक्यात हाणू, असा इशारा सातपुते यांनी दिला.

ये तो सिर्फ झांकी है

यावेळी दरेकर यांनीही वीजबिलावरून राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार लुटारू आहे. शेतकऱ्यांची लूट करत आहेत. आता केवळ आम्ही विधानभवनाच्या पायरीवर बसून आंदोलन करत आहोत. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है, असं सांगत दरेकर यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याचा इशाराच दिला.

विधासभेत आक्रमक नाही?

दरम्यान, वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून भाजप विधानसभेत आक्रमक होणार नसल्याचं सांगण्यात येतं. आज विधानसभा अध्यक्षांची निवड आहे. वीजबिलाच्या मुद्द्यावरून आक्रमक होऊन भाजपला सभात्याग करावा लागला आणि त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात आली तर विधानसभा अध्यक्षांची निवड एकतर्फी होऊ शकते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत भाजपकडून वीजबिलाच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. (bjp mla ram satpute agitation against power bill at vidhan bhavan)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: प्रवीण दरेकरांना धक्का; मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात ऑडिट होणार

LIVE | बीडच्या शासकीय वेअर हाऊसला भीषण आग, 75 कोटींचा कापूस जळून खाक

Maharashtra budget session 2021 LIVE | वाढीव वीज बील प्रश्नावरुन भाजप नेत्यांचं ठिय्या आंदोलन

(bjp mla ram satpute agitation against power bill at vidhan bhavan)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.