फक्त लोकसभाच नाही तर विधानसभाही, भाजपची मोठी रणनीती, घडामोडी वाढणार

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपच्या गोटातील हालाचालींविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फक्त लोकसभाच नाही तर विधानसभाही, भाजपची मोठी रणनीती, घडामोडी वाढणार
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 11:24 PM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : भाजपच्या गोटात प्रचंड घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे फक्त राज्य पातळीवरच नाही तर केंद्र पातळीवर प्रचंड घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात भाजपचं मिशल लोकसभा निश्चित झालंय. महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: आता मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. ते 27 दिवसांचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला 20 ऑगस्टपासून सुरुवात होईल. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात 27 लोकसभा मतदारसंघाचा दौरा असणार आहे. तसेच ते पहिल्या टप्प्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदारसंघांचा दौरा करतील.

चंद्रशेखर बावनकुळे या दौऱ्यात बुथप्रमुख, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. एका लोकसभा मतदारसंघासाठी बावनकुळे प्रत्येकी एक दिवस देणार आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या गोटात राष्ट्रीय पातळीवर देखील अनेक हालचाली घडत आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्राच भाजपचे प्रयत्न सुरु असतानाच देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील भाजपची रणनीती निश्चित झालीय.

महाराष्ट्रातील भाजपचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार

महाराष्ट्रातील भाजप आमदार 19 ऑगस्टला भोपाळला जाणार आहेत. महाराष्ट्रातील 40 आमदार ट्रेनिंगसाठी भोपाळला जाणार आहेत. निवडणूक पूर्व सर्व्हेसाठी आमदारांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ज्या राज्यात निवडणूक होणार त्या राज्यात सर्व्हेसाठी पाठवलं जाणार आहे. भाजपला हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे भाजप पक्ष सतर्क झालाय. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आगामी काळामध्ये होणार आहे. त्या दृष्टीने भाजपकडून महत्त्वाची रणनीती आखण्यात आली आहे.

विविध राज्यांचे एकूण 250 आमदार असणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरात या चार राज्यांतील आमदार असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 40 आमदार असणार आहेत. प्रत्येक आमदाराकडे एक मतदारसंघ दिला जाणार आहे. वेगवेगळ्या मतदारसंघाचा सर्व्हे केला जाणार आहे. कोणत्या मतदारसंघात कुठला उमेदवार देता येईल, तसेच नागरिकांच्या काय समस्या आहेत याचा अभ्यास प्रत्येक आमदार करणार आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्याचे भाजप आमदार सर्व्हेत सहभागी राहणार नाहीत तर इतर राज्याचे भाजप आमदार सर्व्हे करणार आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.