युवा वॉरियर्स, ओबीसी हक्क परिषद; भाजपची महापालिकेसाठी मोर्चाबांधणी सुरू

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (bjp will organized obc parishad says ashish shelar)

युवा वॉरियर्स, ओबीसी हक्क परिषद; भाजपची महापालिकेसाठी मोर्चाबांधणी सुरू
ashish shelar
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 4:05 PM

मुंबई: मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकांना समोरे जाण्यासाठी भाजपने 18 ते 25 वयोगटातील तरुणांची युवा वॉरियर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओबीसींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात ओबीसी हक्क परिषदांचं आयोजन केलं आहे. (bjp will organized obc parishad says ashish shelar)

भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबतची माहिती दिली. भाजपची आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील 40 प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच केंद्रीय पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी वाटचालीवर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यात घ्यावयाच्या आंदोलनावरही चर्चा करण्यात आली. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

तरुणांकडे लक्ष

राज्यासह देशभरातील तरुणांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आकर्षण आहे. भाजपकडे तरुणांचा कल आहे. त्यामुळे या तरुणांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी 18 ते 25 वयोगटातील तरुणांची युवा वॉरियर्स निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुणांची राजकारणातील नवी फळी तयार करण्यात येणार आहे, असं शेलार म्हणाले. तसेच ओबीसींच्या आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात ओबीसी हक्क परिषद घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दुसऱ्याच्या ताटातील खरकटं काढण्याची सवय

यावेळी शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने होता. पण शिवसेनेने सत्तेच्या मोहापायी दोन्ही काँग्रेसची साथ धरली. त्यामुळे जनतेत रोष आहे. या रोषाला आम्ही वाट मोकळी करून देऊ, असं ते म्हणाले. नवी मुंबई आणि मुंबईत शिवसेनेने आमचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या पायावर उभे राहता येत नसल्यानेच आमच्या पक्षातील पदाधिकारी फोडण्याचं काम शिवसेना करत आहे. दुसऱ्याच्या ताटातील खरकटं काढण्याची सवय शिवसेनेला आहे. कोकणातही तशी म्हणच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आघाडी सरकार फोल ठरलं

मुंबई आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण व मृत्यू दर अधिक आहे. यावरून देशात कोरोनाची संख्या राज्यात असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. हे सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरलं आहे. सर्वच बाबतीत हे सरकार अपयशी ठरले आहे. शिवसेना फेल ठरतेय हे जनतेने पाहिलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामे आणि त्यांनी आणलेल्या योजना याच्यापुढे राज्यातील आघाडी सरकारला जाता आले नाही. नव्या योजना आणण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (bjp will organized obc parishad says ashish shelar)

संबंधित बातम्या:

VIDEO | जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्वात सांगलीत मोर्चा, प्रतीक पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी

‘जेवढे आमचे नगरसेवक फोडाल त्यापेक्षा तुपटीने तुमचे फोडू’, गणेश नाईकांचा शिवसेनाला इशारा

LIVE | शिवसेना नेते आनंदराव अडसूळ ईडी कार्यालयात हजर, चौकशीची शक्यता

(bjp will organized obc parishad says ashish shelar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.