महिला पोलिसावर PSI चा बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल
नवी मुंबई : महिला पोलिस कर्मचाऱ्यावर पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) बालत्कार आणि नंतर वारंवार लैंगिक शोषण केल्याची खळबबळजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन महिला पोलिसावर बलात्कार केल्यानंतर, या प्रकाराचे व्हिडीओ शूट करुन पुढेही ब्लॅकमेल करुन वारंवार लैंगिक शोषण या पोलिस उपनिरीक्षकाने केल्याचेही उघड झाले आहे. नेमका प्रकार काय आहे? आरोपी पोलीस उपनिरीक्षक […]
नवी मुंबई : महिला पोलिस कर्मचाऱ्यावर पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) बालत्कार आणि नंतर वारंवार लैंगिक शोषण केल्याची खळबबळजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन महिला पोलिसावर बलात्कार केल्यानंतर, या प्रकाराचे व्हिडीओ शूट करुन पुढेही ब्लॅकमेल करुन वारंवार लैंगिक शोषण या पोलिस उपनिरीक्षकाने केल्याचेही उघड झाले आहे.
नेमका प्रकार काय आहे?
आरोपी पोलीस उपनिरीक्षक आणि पीडित महिला पोलिस कर्मचारी यांची 2010 मध्ये ओळख झाली. या दोघांची चांगली मैत्री होती. याचा गैरफायदा पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला, असा महिला पोलिस कर्मचाऱ्याचा आरोप आहे.
महिला पोलिस कर्मचाऱ्याने पीएसआयवर नेमके काय आरोप केलेत?
“फळांच्या रसात गुंगीचे औषध टाकून पोलिस उपनिरीक्षकाने (पीएसआय) बलात्कार केला. या बलात्कार प्रकाराचा पीएसआयने व्हिडीओ तयार केला. त्यानंतर म्हणजे 2016 पासून पीएसआयने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देत त्याने अनेकदा लैंगिक शोषण केले.”, असे गंभीर आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्याने केला आहे.
पीएसआयच्या या ब्लॅकमेलला कंटाळून पीडित महिला पोलिसाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळल्यानंतर पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी आरोपी पीएसआयविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात आरोपी पोलिस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास महिला सेलकडे देण्यात आला आहे.