कुणाची बीएमडब्ल्यू जप्त तर कुणाची ब्रीझा कार, रिलायन्सकडून 39 कोटींची वसूली; मालमत्ता कर थकवणाऱ्यांना पालिकेचा खाक्या
मालमत्ता कर थकवणाऱ्यांना मुंबई महापालिकेने चांगलाच खाक्या दाखवला आहे. (bmc action against property tax defaulters)
मुंबई: मालमत्ता कर थकवणाऱ्यांना मुंबई महापालिकेने चांगलाच खाक्या दाखवला आहे. मालमत्ता कर थकवल्याने पालिकेने कुणाची बीएमडब्ल्यू कार जप्त केली तर कुणाची ब्रीझा कार ताब्यात घेतली. चेंबूर येथे आयमॅक्स थिएटरचं पाणी कापण्यात आलं तर मे. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडकडून 39 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली. (bmc action against property tax defaulters)
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात महापालिकेने मालमत्ता कर वसूलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत मालमत्ता कर थकबाकीपोटी आतापर्यंत अनेक ठिकाणी अलिशान वाहनांची जप्ती करण्याचा पर्याय वापरण्यात आला, तर काही ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली. ज्यानंतर अनेक प्रकरणी संबंधितांद्वारे मालमत्ता कर रकमेचा भरणा महापालिकेकडे करण्यात आला आहे. यानुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये रुपये 5 हजार 200 कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून आज पर्यंत रुपये 3 हजार 650 कोटी एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे.
पालिकेची कारवाई
>> ‘एच पूर्व’ विभागाच्या हद्दीतील पक्षकार मे. भारत डायमंड बोर्स यांच्या प्रतिदानाच्या विवादा प्रकरणी तोडगा काढून 25.86 कोटी इतकी मालमता कर वसूली करण्यात आली. तसेच ‘मे. रिलायन्स इंडस्ट्रिज लि.’ यांच्या विवीध मालमतांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तकारी प्रकरणातून पक्षकाराकडून रु. 39 कोटी इतक्या मालमता कराच्या रक्कमेची वसूली करण्यात आली.
>> एम पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रातील मे. चंदुलाल पी.लोहना (विकासक मे. जय कन्स्ट्रक्शन) यांची मालमत्ता कराची रुपये 38 लाख 80 हजार 705 इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची ‘बी एम डब्लू कार’ जप्त करण्यात आली. त्यानंतर संबंधितांद्वारे रुपये 19 लाख इतकी रक्कम जमा करुन गाडी सोडवून नेण्यात आली.
>> ‘के पूर्व’ विभाग हद्दीतील अंधेरी असणाऱ्या ‘सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क’ व ‘वरटेक्स बिल्डिंग’ यांच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. तसेच मलवाहिनीही थोपवण्यात आली. या कारवाईनंतर मालमत्ता धारकांनी थकीत रकमेच्या 50% रक्कम, अर्थात अनुक्रमे रक्कम रुपये 9.60 कोटी व 31 लाख रुपये भरण्यात आले.
>> पालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्राच्या हद्दीतील ‘आय मॅक्स थिएटर’ ची मालमत्ता कराची थकबाकी ही रुपये 75 लाख इतकी झाली असल्यामुळे संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे.
>> एम पश्चिम विभाग कार्यक्षेत्रातील मे. युनीटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांची मालमत्ता कराची रुपये 1 कोटी 10 लाख 22 हजार 240 इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची ‘ब्रीझा कार’ जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या बांधकामाच्या जागेवरील ऑफिस ‘सील’ केले आणि बांधकाम कार्य बंद करण्यात आले. (bmc action against property tax defaulters)
VIDEO: MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 March 2021https://t.co/enJfzmnfCt
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 14, 2021
संबंधित बातम्या:
बेवड्याने मुंबई पोलिसांना फिरवले, मुलुंडमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करून उडवली खळबळ
मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वाढतीच, नव्याने किती रुग्णांची वाढ, किती मृत्यू?
(bmc action against property tax defaulters)