Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 70 च्या आसपास, मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी तयार: किशोरी पेडणेकर

महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातील डेल्टा प्लसची रुग्णसंख्या 70 पर्यंत पोहोचली आहे.कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यावर मुंबई महापालिकेने तयारी पूर्ण केली असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हंटल आहे.

देशातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 70 च्या आसपास, मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी तयार: किशोरी पेडणेकर
mayor kishori pednekar
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 9:49 PM

मुंबई: महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातील डेल्टा प्लसची रुग्णसंख्या 70 पर्यंत पोहोचली आहे.कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यावर मुंबई महापालिकेने तयारी पूर्ण केली असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर  (Kishori Pednekar )यांनी म्हंटल आहे.आज घाटकोपर मध्ये वृक्षरोपण करण्याच्या कार्यक्रमाला आल्या असताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. (BMC Mayor Kishori Pednekar said Corona Virus Delta Plus Variant patient number crossed seventy in India)

मुंबई महापालिकेची तिसऱ्या लाटेची तयारी

मुंबई महापालिकेने तिसऱ्या लाटे संबंधी रुग्णालय तयार असून बेड्स,ऑक्सिजनची सुविधा तसेच लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. मुंबईकरही जागृत असून कोरोनाचे नियम पाळत आहेत, असे रस्त्यावरून जाताना दिसत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हंटल.

आशिष शेलार यांना टोला

भाजप नेत्यांनी आता चूप बसावं तुम्ही शांत राहिलात तर सर्वच वाचतील असा टोला आशिष शेलारांनी आज केलेल्या ट्विटवर हाणला आहे

रत्नागिरी जळगावसह, राज्यातील डेल्टा प्लसचे रुग्ण बरे

महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमधून सावरत असतानाच राज्यावर कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंट संकट उभं राहिलं. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रत्नागिरी, जळगाव, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाले आहेत.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा

Delta Plus Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा, जळगावसह रत्नागिरीतील रुग्णांची डेल्टा प्लसवर मात

(BMC Mayor Kishori Pednekar said Corona Virus Delta Plus Variant patient number crossed seventy in India)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.