Narayan Rane : 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा आम्ही पाडू, BMC ची नारायण राणेंना तिसरी नोटीस

मुंबई महापालिकेकडून (BMC) नारायण राणे (Narayan Rane) यांना जुहूतील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे.

Narayan Rane : 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा आम्ही पाडू, BMC ची नारायण राणेंना तिसरी नोटीस
नारायण राणेImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 8:00 PM

मुंबई : मुंबई महापालिकेकडून (BMC) नारायण राणे (Narayan Rane) यांना जुहूतील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती. नारायण राणे यांना ही तिसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे. जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात मुंबई महापालिकेनं दिलेल्या दुसऱ्या नोटीसला नारायण राणे यांच्याकडून देण्यात आलेलं उत्तर न पटल्यानं तिसरं नोटीस देण्यात आलंय. नोटीसमुळं नारायण राणे आणि महाविकास आघाडी (MVA) प्रामुख्यानं शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातंय. नारायण राणे यांना 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तर, नोटीसला देखील 15 दिवसात उत्तर द्यावं लागणार आहे.

तिसरी नोटीस का दिली

नारायण राणेंच्या जुहूमधील बंगल्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं तिसरी नोटीस दिली आहे. दुसऱ्या नोटीसचं उत्तर न पटल्यानं तिसरं नोटीस देण्यात आलं आहे. दुसऱ्या नोटीसला नारायण राणेंनी दिलेलं उत्तर पालिकेना न पटल्यानं तिसरी नोटीस देण्यात आली आहे. नारायण राणे यांना 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता नारायण राणे आणि मुंबई महापालिका यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. नारायण राणे यांना नोटीसला 15 दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात कुठं बदल करण्यात आला, पालिकेनं केलेला दावा

1) पहिल्या मजल्यावरील उद्यानासाठीच्या जागेत रूम 2) दुसऱ्या मजल्यावरील उद्यानासाठीच्या जागेत रूम 3) तिसऱ्या मजल्यावरील उद्यानाच्या जागेत रूम 4) चौथ्या मजल्यावर टेरेस उद्यानासाठीच्या जागेत रूम 5) पाचव्या मजल्यावर टेरेस उद्यानासाठीच्या जागेत रूम 6) सहाव्या मजल्यावर टेरेस उद्यानासाठीच्या जागेत रूम 7) आठव्या मजल्यावरील पॉकेट टेरेसमध्ये रूम 8) टेरेस फ्लोअरचा रूम म्हणून वापर 9) पार्किंगमधील बेसमेंट सर्व्हिस भागाचा राहण्यासाठी वापर

मुंबई महापालिकेच्या नोटीसमध्ये काय?

मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांना मुंबई महापालिका कायदा, 1988 च्या कलम 351 अंतर्गत 6 मार्च रोजी नोटीस बजावली होती. जुहू येथील अधिश बंगल्यात अनधिकृतपणे बदल करण्यात आलेले आहेत, असं नोटीसमध्ये म्हटलं होते. कोणत्या फ्लोअरवर काय बदल करण्यात आले याची यादीचं मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांना नोटीसमध्ये पाठवली होती.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून 21 फेब्रुवारीला पाहणी

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 21 फेब्रुवारीला दोन तास पाहणी केली होती. या बंगल्यातील अतिरिक्त बांधकामासाठी ही पाहणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. बंगल्यात सीआरझेड आणि एफएसआयचं उल्लंघन झाल्याची तक्रार असल्याने महापालिकेने त्याबाबतचीही पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत पोलीसही होते.

इतर बातम्या:

नाना पटोले ‘अमजद खान’, बच्चू कडू ‘निजामुद्दीन शेख’, तर आशिष देशमुख ‘हिना साळुंके’! फोन टॅप झालेल्या नेत्यांची ही नावं वाचाच

IND vs SL: जसप्रीत बुमराह ग्रेट गोलंदाज? फलंदाज त्याला इतके का घाबरतात? वाचा सुनील गावस्करांचं अचूक विश्लेषण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.