पिचकारी बहाद्दरांना मुंबई महापालिकेचा दणका, 39 लाखांहून अधिक दंडवसूली, सर्वाधिक वसूली कोणत्या भागात?

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 461 अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – 2006’ तयार करण्यात आले आहेत.

पिचकारी बहाद्दरांना मुंबई महापालिकेचा दणका, 39 लाखांहून अधिक दंडवसूली, सर्वाधिक वसूली कोणत्या भागात?
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 6:14 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सुविधा देणारी महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची काळजीदेखील नियमितपणे घेत असते. या अंतर्गत आरोग्य सुविधा देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंबही सातत्याने करण्यात येतो. याबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येते. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध व्हावा, यादृष्टीने जनजागृतीपर व दंडात्मक कारवाई देखील सातत्याने करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून महापालिकेद्वारे 200 रुपयांचा दंड सध्या आकारण्यात येत असून, गेल्या 9 महिन्यांमध्ये 19 हजारांहून अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल 39 लाख 13 हजार 100 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती उप आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली आहे. (BMC takes action against those who spit in public places, fine of Rs 39 lakh recovered)

याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मुखपट्टी (मास्क) वापरावी, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 461 अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – 2006’ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करीत असते. याच उपविधीतील क्रमांक 4.5 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून 200 रुपये इतकी दंड वसुली करण्यात येते. यानुसार गेल्या सुमारे 9 महिन्यांच्या कालावधीत 39 लाख 13 हजार 100 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ही प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘ए’ विभागातून करण्यात आली आहे. या वॉर्डमध्ये 6 लाख 15 हजार 800 रुपये इतकी दंडवसूली करण्यात आली आहे. त्या खालोखाल ‘एल’ विभागातून रुपये 6 लाख 12 हजार 200, तर ‘सी’ विभागातून रुपये 4 लाख 52 हजार 200 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

विभागनिहाय दंडवसुली

  • ए विभाग – 615800 रुपये
  • बी विभाग – 322200 रुपये
  • सी विभाग – 452200
  • डी विभाग – 257200
  • ई विभाग – 20000
  • एफ दक्षिण विभाग – 217400
  • एफ उत्तर विभाग – रुपये 50600
  • जी दक्षिण विभाग – 26000
  • जी उत्तर विभाग – 25900
  • एच पूर्व विभाग – 171400
  • एच पश्चिम विभाग – 25800
  • के पूर्व विभाग – 27000
  • के पश्चिम विभाग – 95600
  • पी दक्षिण विभाग – 105800
  • पी उत्तर विभाग – 379600
  • आर दक्षिण विभाग – 34300
  • आर मध्य विभाग – 43800
  • आर उत्तर विभाग – 119800
  • एल विभाग – 612200
  • एम पूर्व विभाग – 20400
  • एम पश्चिम विभाग – 116800
  • एन विभाग – 71300
  • एस विभाग – 90400
  • टी विभाग – 11600

इतर बातम्या

‘लोकल प्रवास नाकारणारं हे जनताविरोधी ठाकरे सरकार’, भातखळकरांचा हल्लाबोल; कांदिवलीत रेलभरो आंदोलन

फडणवीस म्हणतात, राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, मग चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर का?

(BMC takes action against those who spit in public places, fine of Rs 39 lakh recovered)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.