BMC Election Reservation 2022 : तुमचा मतदारसंघ आरक्षित झालाय का? जाणून घ्या मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत एका क्लिकवर
BMC Election Reservation 2022 : महापालिका प्रशासानाने आरक्षण सोडत काढताना एक सूत्रं ठरवलं होतं. त्यानुसार गेल्या तीन निवडणुकीत जे मतदारसंघ ओपन होते त्यांना या निवडणुकीत ओपन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई: मुंबई महापालिकेची (bmc) आरक्षण सोडत (reservation) काढण्यात आली आहे. त्यात अनेक मात्तबरांना घरी बसावं लागलं आहे. तर काहींना नव्या मतदारसंघातून लढण्याची संधी मिळाली आहे. महापालिका प्रशासानाने आरक्षण सोडत काढताना एक सूत्रं ठरवलं होतं. त्यानुसार गेल्या तीन निवडणुकीत जे मतदारसंघ ओपन होते त्यांना या निवडणुकीत ओपन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आजची सोडत काढण्यात आली आहे. आज मतदारसंघांचं चित्रं स्पष्ट झालं आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) ही निवडणूक होणार असल्याचं आजच्या सोडतीने स्पष्ट झालं आहे. येत्या सप्टेंबरमध्ये महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मतदारसंघाचे चित्रं स्पष्ट झाल्याने वॉर्डाच्या बांधणीसाठी स्थानिक नगरसेवक आणि इच्छुकांना वेळ मिळाला आहे. तसेच ज्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत, ते आता नवा मतदारसंघ मिळावा म्हणून जोरदार लॉबिंग करताना दिसणार आहेत.
अनुसूचित जातीसाठीचे राखीव मतदारसंघ
60,85,107,119,139,153,157,162,165,190,194,204,208, 215, 221, 15
15 प्रभागातून 8 प्रभाग स्त्रियांसाठी राखीव
139 अनुसुचित जाती महिला sc 190 अनुसुचित जाती महिला sc 194 अनुसुचित जाती महिला sc 165 अनुसुचित जाती महिला sc 107 अनुसुचित जाती महिला sc 85 अनुसुचित जाती महिला sc 119 अनुसुचित जाती महिला sc 204 अनुसुचित जाती महिला sc
अनुसूचित जमातीसाठीचे राखीव मतदारसंघ
55, 124
अनसूचित जमाती महिला राखीव
124 अनुसुचित जमाती महिलासाठी आरक्षित
सर्वसाधारण महिला आरक्षण
प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 22, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 172, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230,236
प्राधान्य क्रम 2 (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233, 234
सर्वसाधारण महीला आरक्षित प्रभाग क्रमांक – 44, 102, 79,11,50,154,155,75,160,81,88,99,137,217,146, 188, 148,96 ,9, 185,130, 232,53