ओळखपत्र दाखवा आणि लस घ्या; मुंबई महापालिकेची विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम

राज्यात कोरोनाच्या दोन्ही लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लसीकरण मोहिमेला वेग आला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे.

ओळखपत्र दाखवा आणि लस घ्या; मुंबई महापालिकेची विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम
VACCINATION
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 10:45 PM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दोन्ही लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लसीकरण मोहिमेला वेग आला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. महिलांच्या यशस्वी लसीकरण अभियानानंतर मुंबई महानगरपालिका आता फक्त विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहे. येत्या काही दिवसात ही मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. (BMC will Arrange special vaccination drive for students)

मुंबईत येत्या आठवड्याभरात ही विशेष लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. यात 18 वर्षावरील बहुतांश विद्यार्थ्यांचं लसीकरण केले जाणार आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 1200 हून अधिक महाविद्यालये आहेत. त्यात 7 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील साधारणत: 3 लाख विद्यार्थी 18 वर्षावरील आहेत. त्यातील अर्ध्या विद्यार्थ्यांनी लस घेतली असण्याची शक्यता आहे. इतर लसीकरणाचा टक्का तुलनेने कमी आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवून हा टक्का वाढवण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. दरम्यान आतापर्यंत परदेशी जाणाऱ्या 28,903 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मुंबईत कोव्हिड चाचण्यांचा एक कोटींचा टप्पा पार

‘कोविड – 19’ या साथरोगाच्या प्रसारास आळा घालण्याच्या विविध स्तरीय उपाययोजनांचा एक प्रमुख भाग आहे तो म्हणजे कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करण्याची कार्यवाही व व्यवस्थापन सातत्याने अधिकारी प्रभावीपणे करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च 2020 पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे. यानुसार 21 सप्टेंबर 2021 पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 1 कोटी 59 हजार 254 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

‘कोविड – 19’ या साथ रोगाचा पहिला रुग्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च 2020 मध्ये आढळून आला. तेव्हापासून आजतागायत बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांमध्ये कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचे कारण म्हणजे कोविड या संसर्गजन्य रोगाची बाधा झाल्याचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. ज्यामुळे सदर बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो. हीच बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन कोविड विषयक चाचणी करून घेण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने जनजागृती करीत आहे आणि नियमितपणे चाचण्या देखील करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये आणि निर्धारित केंद्रांमध्ये या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत.

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 260 पेक्षा अधिक चाचणी केंद्रे (नमुना संकलन केंद्रे) विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच बरोबर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये देखील या चाचण्या करण्यात येत आहेत. या सर्व चाचण्यांचे निकाल हे चाचणीचा निकाल आल्यापासून 24 तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे गरजेचे आहे.

इतर बातम्या

चंद्रकांत पाटलांचे आरोप दळभद्री, चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा करणार: संजय राऊत

संजय राऊत मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

चर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत

(BMC will Arrange special vaccination drive for students)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.