आता हवं तिथं घर घ्या, पर्यायी घर नको असल्यास थेट 50 लाख रुपये मिळणार: मुंबई महापालिकेची आयडियाची कल्पना

एखादा विकास प्रकल्प राबवत असताना प्रकल्पबाधितांचे करण्यात येणारे पुनर्वसन हा मुंबई महापालिकेचा नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे. (bmc's new option for Project-affected people in mumbai)

आता हवं तिथं घर घ्या, पर्यायी घर नको असल्यास थेट 50 लाख रुपये मिळणार: मुंबई महापालिकेची आयडियाची कल्पना
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 5:51 PM

मुंबई: एखादा विकास प्रकल्प राबवत असताना प्रकल्पबाधितांचे करण्यात येणारे पुनर्वसन हा मुंबई महापालिकेचा नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे. अनेकजण पर्यायी घरे घेण्यास नकार देतात. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन होत नाही. परिणामी विकास प्रकल्प रखडतात. त्यावर महापालिकेने एक नामी तोडगा काढला आहे. प्रकल्पबाधितांना पर्यायी घरे नको असल्यास त्यांना थेट 50 लाख रुपये देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतील प्रकल्पग्रस्ताना माहूलमध्ये घरे दिली जात होती, पण तिकडे जाण्यास प्रकल्पग्रस्तांचा विरोध होता. अनेक प्रकल्पग्रस्त पालिकेने बांधलेल्या घरांमध्ये जाण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे पर्यायी घर नको असलेल्या प्रकल्पबाधितांना थेट आर्थिक मोबदला म्हणून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्थायी समितीत या निर्णयाला मंजुरीही देण्यात आली आहे.

हवं तिथं घर घेता येणार

महापालिकेच्या या निर्णयामुळे सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेकडून रोख रक्कम मिळाल्याने अनेकांना हवं तिथं घर घेता येणार आहे. त्यामुळे मनासारखं घर खरेदी करण्याची संधीही बाधितांना मिळणार आहे.

घरांचे वितरणच नाही

महापालिकेने आतापर्यंत मालमत्ता विभागाच्या मार्फत 24 हजार 496 प्रकल्प बाधितांना घरे देण्यात आली आहेत. सध्या चेंबूरच्या एम/ पूर्वमध्ये 819 व इतर ठिकाणी 131 सदनिका अजून वितरीत करण्याच्या बाकी आहेत. तर एव्हरस्माईल लेआऊट, माहूल येथील 3828 सदनिका कोर्टाच्या निर्णयामुळे वितरीत करता येत नसल्याचं महापालिका सूत्रांनी सांगितलं.

40 हजार घरांची गरज

सध्या महापालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील प्रकल्प बाधित कुटुंबांची संख्या 36 हजार 221 आहे. त्यामुळे भविष्यात या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची गरज पडल्यास महापालिकेला 40 हजार सदनिकांची गरज भासणार आहे, असंही पालिका सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या पालिकेला सूचना

दरम्यान, अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. कोविडमध्ये आपण खूप चांगली कामगिरी केली आहे. आता रस्ते, पदपथ, स्वच्छता, नागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रित करून कालबद्ध रीतीने ती कामे पूर्ण करा आणि मुंबई शहराचा देशात आदर्श निर्माण करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आजच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात, राजकारण तापायला सुरुवात

आर्यन खानची केस फेक, मुंबईत दहशत माजवण्याचा-खंडणीचा धंदा सुरुय, सर्वांचे पुरावे देणार : नवाब मलिक

Aryan Khan : आर्यन खानची मुंबई हायकोर्टात धाव, विशेष NDPS कोर्टाच्या निर्णयाला आव्हान, दिलासा मिळणार?

(bmc’s new option for Project-affected people in mumbai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.