अमिताभ बच्चनने दिले चार ऑफिस भाड्याने, महिन्याचे भाडे मध्यमवर्गीयाच्या एका फ्लॅट इतके
Mumbai real estate and amitabh bachchan | मुंबईत लोटस सिग्नेचर बिल्डिंग अमिताभ बच्चन, अभिनेता कार्तिक आर्यन, मनोज बाजपेयी, सारा अली खान, अजय देवगण, काजोल यांनी जागा घेतली आहे. त्यात अमिताभ बच्चन याने ही जागा भाड्याने दिली आहे. त्याचे महिन्याचे भाडे मध्यमवर्गीयाच्या एका फ्लॅट इतके आहे.
गोविंद ठाकूर, मुंबई, दि. 30 डिसेंबर 2023 | बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक हालचालींकडे देशभरातील लोकांचे लक्ष असते. अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलीवूड स्टारकडून मुंबईतील चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली गेली आहे. मुंबईतील अंधेरीत असलेल्या लोटस सिग्नेचर बिल्डिंग अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे अभिनेता कार्तिक आर्यन, मनोज बाजपेयी, सारा अली खान, अजय देवगण आणि त्यांची पत्नी काजोल यांनी देखील जागा खरेदी केली आहे. आता अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील लोटस सिग्नेचर बिल्डिंगमध्ये घेतलेले चार ऑफिस भाड्याने दिले आहे. युनिट्स वॉर्नर म्युझिक प्रायव्हेट लिमिटेडला ₹17.30 लाखांच्या मासिक भाड्याने हे ऑफिस दिले आहेत. म्हणजे एखाद्या शहरात मिळणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या फ्लॅट इतके हे भाडे आहे. यामुळे बिग बी यांच्या या घटनेची चर्चा सुरु झाली आहे.
तीन वर्षांनंतर भाडे वाढून 19.90 लाखांवर
अमिताभ बच्चन यांनी भाड्याने दिलेल्या जागेच्या करारात दर तीन वर्षांना भाडेवाढ केली आहे. 36 महिन्यांनंतर वाढून ₹19.90 लाख होईल. लिज करारामुळे अमिताभ बच्चन यांना पहिल्या तीन वर्षांसाठी ₹2.07 कोटी वार्षिक भाडे मिळणार आहे. तसेच चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी ₹2.38 कोटी होईल. लीज मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. या जागेत 12 पार्किंग दिल्या आहेत. कार्तिक आर्यन, मनोज बाजपेयी, सारा अली खान, अजय देवगण आणि काजोल यांच्यासह इतर बॉलीवूड कलाकारांनीही याच इमारतीत ऑफिसची जागा खरेदी केली आहे.
28.73 कोटींमध्ये खरेदी केली होती जागा
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये ओशिवरा येथील लोटस सिग्नेचर बिल्डिंगमधील चार ऑफिस युनिट्स ₹ 28.73 कोटींमध्ये खरेदी केल्या होत्या. त्यांनी आता वॉर्नर म्युझिक प्रायव्हेट लिमिटेडला ₹ 17.30 लाखांच्या मासिक भाड्याने भाड्याने दिले आहे. अंधेरीतील वीरा देसाई रोडवरील 28 मजली लोटस सिग्नेचर ऑफिस टॉवर आहे. त्याच्या 21 व्या मजल्यावरील व्यावसायिक युनिट्स 10,180 चौरस फूट कार्पेट एरियामध्ये पसरल्या आहेत. वॉर्नर म्युझिक 170 रुपये प्रति चौरस फूट भाडे मिळणार आहे. Propstack.com मधील नोंदीत ही माहिती दिली आहे.