बंगाली बाबाकडून सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार, कोर्टाने अशी शिक्षा दिली की…

Mumbai high Court | कनिष्ठ न्यायालयाने मेहंदी कासिम जेनुल आबिदीन शेख उर्फ बंगाली बाबा याला सात जणांवर केलेल्या अत्याचार प्रकरणात दोषी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या शिक्षेविरोधात बंगाली बाबाने उच्च न्यायालयात धाव घेतली.

बंगाली बाबाकडून सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार, कोर्टाने अशी शिक्षा दिली की...
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 10:14 AM

मुंबई | दि. 5 मार्च 2024 : मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. एका तांत्रिकाला अत्याचार प्रकरणात कठोर शिक्षा दिली आहे. या बंगाली बाबा उर्फ मेहंदी शेख याने सात जणांवर पाच वर्षांहून अधिक काळ अत्याचार केला. बौद्धिकदृष्ट्या अपंग मुले असल्याच्या बहाण्याने त्याने सात मुलींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले, त्यापैकी सहा अल्पवयीन होत्या. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मुलींच्या शोषणाचे हे ‘क्लासिक केस’ ठरवून कठोर शिक्षा केली आहे. आता अल्पवयीन बलात्कार प्रकरणात तांत्रिकाला आयुष्यभर तुरुंगात ठेवा, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने बंगाली बाबाला आयुष्यभर तुरुंगात ठेवण्याचा निर्णय दिला. या प्रकरणात 2016 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने बंगाली बाबाला जन्मठेपेची शिक्षा करण्याचा निर्णय दिला होता. कनिष्ठ न्यायालयाने मेहंदी कासिम जेनुल आबिदीन शेख उर्फ बंगाली बाबा याला सात जणांवर केलेल्या अत्याचार प्रकरणात दोषी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या शिक्षेविरोधात बंगाली बाबाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने बंगाली बाबाची शिक्षा अधिक कठोर करत त्याला धक्का दिला.

न्यायालयाने ठरवली ‘क्लासिक केस’

बंगाली बाबाने सहा अल्पवयीन मुलींचे केलेले लैंगिक शोषण ही ‘क्लासिक केस’ आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मेहंदी शेख उर्फ ​बंगाली बाबाला सुनावलेली शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली नाही तर त्यात बदल करून पुन्हा कठोर पद्धतीने लागू केली. बंगाली बाबाने अत्याचार केलेल्या मुलींमध्ये सधन कुटुंबातील तीन बहिणी आणि स्त्रिया होत्या.

हे सुद्धा वाचा

2004 ते 2010 दरम्यान झालेले हे अत्याचाराचे प्रकरण आहे. त्यावेळी मुलींचे वय पाच ते 16 वर्ष होते. पोलिसांनी 2010 मध्ये अटक केलेल्या बाबांच्या दोन घरातून दागिने आणि 1 कोटी रुपये जप्त केले होते. अपील फेटाळताना, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने सांगितले की, फिर्यादीने आपला खटला सिद्ध केला आहे. तसेच पीडितांच्या जबाबामुळे बंगाली बाबाचा दोष निश्चित झाला आहे. त्याला वैद्यकीय अहवालाची पुष्टी मिळाली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.