मुंबईत बिल्डरची गोळ्या झाडून आत्महत्या
मुंबई : चेंबुर परिसरातील बिल्डरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संजय अग्रवाल असे बिल्डरचे नाव आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वत:वर गोळ्या झाडून बिल्डर संजय अग्रवाल यांनी आत्महत्या केली. बिल्डर संजय अग्रवाल यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. चेंबुर पोलिस ठाण्यात या आत्महत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात […]
मुंबई : चेंबुर परिसरातील बिल्डरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संजय अग्रवाल असे बिल्डरचे नाव आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वत:वर गोळ्या झाडून बिल्डर संजय अग्रवाल यांनी आत्महत्या केली.
बिल्डर संजय अग्रवाल यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. चेंबुर पोलिस ठाण्यात या आत्महत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. बिल्डर संजय अग्रवाल यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे, हे आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल.
बिल्डरांची लॉबी, बिल्डरांची दमदाटी इत्यादी गोष्टी मुंबईसारख्या शहरांमध्ये कायमच चर्चेला असतात. त्याचप्रकारे, बिल्डरने आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वर्ष-दोन वर्षांपूर्वी ठाण्यात सुरज परमार या बिल्डरने आत्महत्या केली होती. त्यावेळीही परमार हत्याप्रकरण प्रचंड गाजलं होतं. काही राजकीय नेत्यांची नावेही परमार आत्महत्या प्रकरणात समोर आली होती.
मुंबई किंवा तत्सम मेट्रो शहरांमधील जमिनीचे भाव कायम चढत्या दरात आहेत. दिवसागणिक जमिनीचे भाव वाढत असताना, बिल्डरांचा सुळसुळाट आणि त्याचवेळी दादागिरीचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, अनेकदा बिल्डरांनाही दबावात आणलं जातं. ठाण्यातील सुरज परमार आत्महत्या प्रकरणावरुन हे लक्षात आले होते. मात्र, बिल्डर संजय अग्रवाल यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय, हे आता चेंबुर पोलिसांच्या तपासातच उघड झालं आहे.