नशा का करतो म्हणून विचारताच भडकला, विचित्र हावभाव करत छेड काढल्यामुळे महिला पोलिसाने दिला चोप, व्हिडीओ व्हायरल

लोकल ट्रेनमध्ये नशा करत असलेल्या तरुणाला जाब विचारल्यानंतर त्याच तरुणाने महिला पोलिसाची छेड काढल्याचा गंभीर प्रकार वडाळा रेल्वे स्थानकावर घडला.

नशा का करतो म्हणून विचारताच भडकला, विचित्र हावभाव करत छेड काढल्यामुळे महिला पोलिसाने दिला चोप, व्हिडीओ व्हायरल
WADALA YOUNG BOY BEATEN
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 12:01 AM

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये नशा करत असलेल्या तरुणाला जाब विचारल्यामुळे त्याच तरुणाने महिला पोलिसाची छेड काढल्याचा गंभीर प्रकार वडाळा रेल्वे स्थानकावर घडला. हा प्रकार घडल्यानंतर महिला पोलिसाने या तरुणाला चांगलाच चोप दिला. तरुणाला मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. महिला पोलिसाची छेड काढणाऱ्या या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against young boy who molested police constable at wadala railway station)

महिला पोलिसाला हावभाव करत छेड काढली 

मिळालेल्या माहितीनुसार वडाळा रेल्वेस्थानक परिसरात एक तरुण नशा करत होता. त्याला याबाबात महिला कॉन्स्टेबलने जाब विचारला. पण उत्तर न देता याच तरुणाने महिला कॉन्स्टेबलला शिवीगाळ केली. तसेच नंतर छेड काढत विचितत्र हावभाव केले. या प्रकारानंतर या तरुणाला वडाळा रेल्वे स्थानकावर महिला कॉन्स्टेबलने भरपूर चोप दिला. यानंतर तरुणाविरोधात वडाळा जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तुफान राडा

पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात 14 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात तुफान राडा झाला. आमदार सुनील भुसारा आणि निलेश सांबरे यांच्या गटात ही हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे 6 तर काँग्रेसचे 1 सदस्य गट स्थापनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी हा गदारोळ झाला. या दरम्यान आमदार सुनील भुसारा आणि माजी सभापती काशीनाथ चौधरी यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आणि उपाध्यशांची निवडणूक जवळ आली असल्याने जिल्हा परिषद गटस्थापनेसाठी निलेश सांबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे 6 सदस्य आणि काँग्रेसच्या 1 सदस्यांच्या पाठिंबाने गट स्थापन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बसले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांच्या गटाचा याला विरोध होता. त्यामुळे जिल्हाधिकारींच्या दालनात निलेश सांबरे गट आणि सुनील भुसारा गटात मोठा गदारोळ झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दालनाबाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.

इतर बातम्या :

‘तुझी लायकी नाही, तुझ्यासोबत माझ्या मुलीचे लग्न करणार नाही’, प्रेयसीच्या आईचा दम, नंतर प्रियकराने जे केलं त्याने टिटवाळा हादरलं

ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नर्सचा छळ, मुलीशी अश्लील भाषेत बातचित, पीडितेच्या न्यायासाठी चित्रा वाघ कडाडल्या

फी दरवाढीला विरोध अंगाशी, विद्यार्थ्याचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवलीतील शाळेचा प्रताप

(case registered against young boy who molested police constable at wadala railway station)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.