Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झटका, मुलगी अन् सुनेवर आरोप पत्र

anil deshmukh | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने झटका दिला आहे. २०२१ मधील अहवाल प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेवर आरोपपत्र दाखल झाले आहे. दोन वर्षानंतर सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून वसुली केल्याचा आरोपासंदर्भातील हा अहवाल आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झटका, मुलगी अन् सुनेवर आरोप पत्र
anil deshmukhImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 9:47 AM

मुंबई, दि. 21 नोव्हेंबर | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) चांगलाच झटका दिला आहे. अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. 2021मधील अहवाल माध्यमांमध्ये लिक प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा हिच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूजा यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागासोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. 29 ऑगस्ट 2021 रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता.

काय होते प्रकरण

मुंबईते तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा हा आरोप होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा हिने लीक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेत तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डगा यांना अटकही झाली होती.

हे सुद्धा वाचा

दोघांवर आरोपपत्र

अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख विरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिल्याचा ठपका या आरोपपत्रात केला आहे. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निर्देशावर सीबीआय करत होती. पूजा, राहत यांच्यासोबत अनिल देशमुख यांचे नातेवाई विक्रांत देशमुख आणि सयाजीत वायल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. परंतु ताब्यात घेतले नव्हते.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.