शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची?, राज ठाकरेंनी सांगितलं कारण

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनेच साजरी करा. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा आपल्यासाठी एक उत्सवच आहे. एक सणच आहे. वाढदिवस वगैरे या गोष्टी सामान्य माणसांसाठी असतात. महापुरुषांची जयंती असते.

शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची?, राज ठाकरेंनी सांगितलं कारण
शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची?, राज ठाकरेंनी सांगितलं कारण
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 12:34 PM

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (shiv jayanti) तिथीनेच साजरी करा. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा आपल्यासाठी एक उत्सवच आहे. एक सणच आहे. वाढदिवस वगैरे या गोष्टी सामान्य माणसांसाठी असतात. महापुरुषांची जयंती असते. गणेशोत्सव असो की दिवाळी आपण तिथीने साजरी करतो. त्यामुळे शिवाजी महाराजांची (shivaji maharaj) जयंतीही तिथीनेच साजरी झाली पाहिजे, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. साकीनाका येथे मनसेच्या शाखेचं राज ठाकरे (raj thackeray)यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना या सूचना केल्या. तसेच पुढच्यावेळी शिवजयंती तिथीने याही पेक्षा जल्लोषात साजरी करण्याचं आवाहन केलं. यावेळी मनसे सैनिकांनी टाळ्याच्या गजरात राज यांच्या या सूचनेचं स्वागत केलं. तसेच यावेळी जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असोचा जयघोषही केला. या कार्यक्रमाला मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यासपीठावर येण्याचं कारण तुमचं दर्शन व्हावं. हारतुरे घालायला मी आलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवजयंती तिथीने साजरी करते. याचा अर्थ आज शिवजयंती साजरी करायची असे नाही. आपल्या छत्रपतींचा जयजयकार आणि जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे. आजही साजरी केली तरी काही हरकत नाही. तिथीने साजरी केली तरी काही हरकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

जल्लोषात जयंती साजरी करा

तिथिनेच शिवजयंती का साजरी करायची? याचं एकमेव कारण आपल्याकडे जेवढे सण येतात, मग ती दिवाळी, गणपती जेवढे काही सण येतात ते आपण तिथिने साजरे करतो. तारखेने साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती. यावेळी दिवाळी त्याच तारखेला येत नसते. मागच्या वर्षी गणपती ज्या तारखेला आले त्याच तारखेला या वर्षी गणपती येत नसतात. गणेशोत्सव तिथीनुसार येतो. जन्म दिवस आणि वाढदिवस आपले. महापुरुषांचा तोही छत्रपतींचा जन्म दिवस आपल्यासाठी सण आहे. म्हणून तो सण तिथीने साजरा करायचा. म्हणजे तो आज केला पाहिजे असं नाही. जेव्हा तिथीने साजरी करायची तेव्हा याहून अधिक जल्लोषात साजरी करा, असं ते म्हणाले.

शाखा आहे, दुकान नाही

यावेळी त्यांनी शाखेचं उद्घाटन केल्यानंतर मनसे सैनिकांना काही सूचनाही केल्या. या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ही शाखा आहे दुकान नाही, असं राज यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.

रांगोळीला राज स्टाईलने दाद

यावेळी स्टेजजवळ शिवाजी महाराजांची रांगोळी काढण्यात आली होती. ही रांगोळी पाहून राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलमध्ये दाद दिली. ही रांगोळी कुणी काढली? असा सवाल त्यांनी केला. त्यावेळी नवाथे म्हणून आहेत त्यांनी काढली असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर कुठे आहेत नवाथे? असा सवाल त्यांनी केला. नवाथे निवांत असतील, अशी कोटी त्यांनी करताच एकच खसखस पिकली. मात्र, ही रांगोळी छान काढली आहे, असं तोंडभरून कौतुकही त्यांनी केलं.

संबंधित बातम्या:

यवतमाळच्या शिवभक्तानं घरावरच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, आर्णीच्या सचिन भोयर यांची संकल्पना

Maharashtra News Live Update : आताचे शिवसेना पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आलेत : नारायण राणे

Nagpur Crime | पचास लाख दे, नहीं तो तेरे बाप के पास भेज दुँगा, नागपुरात नेमकं काय घडलं?

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.