Holi 2023 | कोकणवासीयांसाठी 12 स्पेशल ट्रेन, ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु, वाचा सर्व गाड्यांची सविस्तर माहिती
होळी सणानिमित्ताने कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या गाड्यांची सविस्तर माहिती देण्यासाठी प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.
मुंबई : होळी सणानिमित्ताने कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात होळी सणाचा आनंद वेगळाच असतो. या सणानिमित्ताने लाखो कोकणवासी मुंबईहून आपापल्या गावी जातात. कोकणात जवळपास तीन ते चार दिवस होळी सणाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असते. होळी निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करता मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन गाड्यांचा निर्णय घेतला आहे. गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 12 स्पेशल ट्रेन चालवण्याचं नियोजन केलं आहे. या ट्रेनसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगटी सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने या गाड्यांची सविस्तर माहिती देण्यासाठी प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धी पत्रकात याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. एकूण 12 गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची देखील गैरसोय टळणार असून प्रशासनाला देखील त्याचा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलंय?
मध्य रेल्वे 12 अतिरिक्त होळी स्पेशल ट्रेन चालवणार आहे
होळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/पनवेल आणि सावंतवाडी रोड/रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त 12 विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रत्नागिरी विशेष (3 सेवा)
01151 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 4.3.2023 आणि 07.3.2023 रोजी 00.30 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी 09.00 वाजता पोहोचेल. 01152 विशेष रत्नागिरी येथून दि. 6.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी 13.50 वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.
2. पनवेल – रत्नागिरी विशेष (4 सेवा)
01153 विशेष गाडी दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी पनवेल येथून 18.20 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी 00.20 वाजता पोहोचेल. 01154 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी 16.20 वाजता पोहोचेल.
थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.
3. पनवेल – सावंतवाडी रोड विशेष (4 सेवा)
01155 विशेष गाडी पनवेल येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी 18.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. 01156 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी 07.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.20 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
4. रत्नागिरी- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे विशेष
01158 स्पेशल रत्नागिरी येथून 9.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. थांबे: संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे.
या सर्व विशेष गाड्यांची संरचना: 18 शयनयान , 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन
आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे बुकिंग तात्काळ उघडण्यात आले आहे.
थांब्यांच्या वेळेच्या तपशीलासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.