दहशतवादी हल्ल्याची भीती? दहशतवाद्यांकडे फोटो सापडताच मुंबईतील छाबड हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त

पोलिसांना या दोन दहशतवाद्याकंडे काही उपकरणं सापडली आहे. तसेच ड्रोन बनवण्याचं साहित्यही सापडलं आहे. ड्रोनद्वारे या दहशतवाद्यांना छाबडा हाऊस टार्गेट करायचं तर नव्हतं ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

दहशतवादी हल्ल्याची भीती? दहशतवाद्यांकडे फोटो सापडताच मुंबईतील छाबड हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त
Chabad HouseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 9:13 AM

मुंबई | 30 जुलै 2023 : काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे काही साहित्य सापडले आहे. मात्र, या दोन दहशतवाद्यांकडे मुंबईतील छाबडा हाऊस म्हणजे नरीमन हाऊसच्या गुगल इमेज सापडल्या आहेत. 26/11चा मुंबईवर हल्ला झाला होता. तेव्हा याच छाबडा हाऊसमध्ये दहशतवादी घुसले होते. आता या दहशतवाद्यांकडे छाबडा हाऊसचे फोटो सापडल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. या छाबडा हाऊसभोवती बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच या दहशतवाद्यांकडे फोटो आणि साहित्य सापडल्याने पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

पुणे एटीएसने 2 दहशतवादी तरुणांना अटक केलेली होती. या दोन तरुणांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाबा येथील छाबड हाऊसची गुगल इमेज मिळालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे? त्यामुळे मुंबई पोलिसांकडून छाबड हाऊसची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात देखील छाबड हाऊस हे दहशतवाद्यांच टार्गेट होत. आता मुंबई पोलिसांनी खबरदारी घेत या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे.

हे सुद्धा वाचा

सीनिअर अधिकाऱ्यांकडून पाहणी

पोलिसांना या दोन दहशतवाद्याकंडे काही उपकरणं सापडली आहे. तसेच ड्रोन बनवण्याचं साहित्यही सापडलं आहे. ड्रोनद्वारे या दहशतवाद्यांना छाबडा हाऊस टार्गेट करायचं तर नव्हतं ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. छाबडा हाऊस बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी सीनिअर पोलीस अधिकारी वारंवार येऊन पाहणी करत आहेत. या ठिकाणी चार सीनिअर पीआय आणि एक एपीआय नजर ठेवून आहेत. तसेच बॉम्ब निकामी पथकाची गाडीही या परिसरात तैनात करण्यात आली आहे. तसेच स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इसीस मॉड्यूल उद्ध्वस्त होणार

दरम्यान, महाराष्ट्रातील इसीसचे मॉड्युल उद्धवस्त करण्यासाठी एमआयएने कडक कारवाईला सुरुवात केली आहे, याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्यातील डॉ. अदनान अली सरकारचा समावेश आहे. इसीसचे पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयन्त होता, मात्र एनआयएच्या कारवाईने तो प्रयत्न अयशस्वी झाला आहे.

एनआयएने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली आहे. ‘एनआयए’ कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आली तेव्हा डॉ. अदनान अली सरकार आयएसच्या दहशतवादी विचारधारेच्या प्रसारात सामील असल्याची माहिती मिळाली.

तो तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून काम करत होता. अली सरकार हा पुण्यातील कोंढवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून राहत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.