मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील तीन महत्त्वाचे प्रश्न आणि मुद्दे सांगा; बक्षिस मिळवा: चंद्रकांत पाटील
राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over assembly speech)
मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातील राज्याचे तीन महत्त्वाचे प्रश्न आणि मुद्दे सांगा, आम्ही त्याला बक्षिस देऊ, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over assembly speech)
चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणाला काहीच अर्थ नव्हता. या भाषणाला राजकीय ही म्हणता येणार नाही. राजकीय म्हटलं तरीही त्यात काही नव्हतं. राज्याचा विषय सोडून ते सर्व विषयावर बोलले. शेतकऱ्यांबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही. इथल्या शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली. त्यावरही कुणी बोलत नाही, असं पाटील म्हणाले.
ते सत्यच आहे
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान झालेल्या बंददाराआडील चर्चेवरही पाटील यांनी भाष्य केलं. अमित शहा यांचा विषय वारंवार काढला तरी सत्य ते सत्यच आहे. शहा यांनी कुठलाही शब्द दिला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.
फडणवीसांचीही टीका
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली. अमित शाह यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री जे बोलले ते उसने अवसान आणून खोटे बोलले. सत्य त्यांना ठावूक आहे. या संपूर्ण भाषणात महाराष्ट्राच्या एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही. शार्जिलबाबत बोलण्याची त्यांची हिंमत नाही. तो पुण्यात येतो, हिंदूंना सडका म्हणून जाण्याची त्याची हिंमत होते. पण, त्याला पकडण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. शिवसेना स्वातंत्र्यसंग्रामात नव्हती, हे त्यांनी सांगितले हे बरेच केले. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे स्वत: एक स्वातंत्र्यसैनिक होते, हे कदाचित त्यांना ठावूक नसावे. भाजपाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी बलिदान दिले, असे फडणवीस म्हणाले.
सभागृहात बोलू दिले नाही
सरकारने दिलेले राज्यपालांचे भाषण जसे दिशा देणारे नव्हते, तसेच आजच्या मुख्यमंत्र्यांचे भाषण सुद्धा दिशाहिन होते. त्यांनी महाराष्ट्राची संपूर्णपणे निराशा केली. आम्ही गैरप्रकार दाखविला, भ्रष्टाचार काढला तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणतात. आमच्यामुळे भ्रष्टाचार बाहेर आला तरच महाराष्ट्र वाचेल. आपल्या भाषणाची चीरफाड होऊ नये, म्हणून त्यांनी आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही, असा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट हिंदुत्वालाच हात घातला. तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तरी आठवण ठेवलीत त्याबद्दल तुमचे आभारीच आहोत. पण तुम्हाला आज बाळासाहेबांचे उमाळे येत आहेत. त्याच बाळासाहेबांच्या खोलीत भाजपचे नेते अमित शहा आणि आमच्यात चर्चा झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांना दाराबाहेर ठेवलं होतं. आतमध्ये मी आणि शहा होतो. या बंद दाराआड ठरलेली गोष्ट तुम्ही निर्लज्जपणे नाकारता… निर्लज्ज हा शब्द असंसदीय असला तरी मी तो वापरतो… हेच तुमचं हिंदुत्व… हेच तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांची खोली तुमच्यासाठी एखादी खोली असू शकते, पण आमच्यासाठी ते मंदिर आहे, असं मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना उद्देशून सांगितलं. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over assembly speech)
मुख्यमंत्र्यांकडून ‘निर्लज्ज’ शब्दाचा वापर, मुनगंटीवारांची हरकत, जाधवांचं उत्तर; गोंधळ, घोषणाबाजी आणि काय काय? वाचा सविस्तरhttps://t.co/JXb5iQO1yA#cmuddhavthackeray | #bhaskarjadhav | #Devendrafadnavis | #SudhirMungantiwar | #bjp | #ShivSena | #ncp
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2021
संबंधित बातम्या:
नारायण भंडारी, माधव भंडारी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख आणि फडणवीसांची दिलगिरी
(chandrakant patil slams cm uddhav thackeray over assembly speech)