चौपाल, मराठी कट्टा आणि उत्तर भारतीय…. भाजपचं ‘मिशन मुंबई महापालिका’ काय आहे? वाचा सविस्तर

भाजपनं उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुंबईत 'चौपाल' सुरू केले आहेत. तर मराठी मतदारांना खेचण्यसाठी भाजपनं 'मराठी कट्टा' सुरू केला आहे.

चौपाल, मराठी कट्टा आणि उत्तर भारतीय.... भाजपचं 'मिशन मुंबई महापालिका' काय आहे? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 9:42 AM

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलीय. त्याच्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसलीय. भाजपनंही आगामी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपकडून वेगळी रणनिती आखण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपनं चौपाल, मराठी कट्टा अशा विविध उपक्रमांमधून मतदारांना खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.

चौपाल, मराठी कट्टा आणि उत्तर भारतीय

भाजपनं उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुंबईत ‘चौपाल’ सुरू केले आहेत. भाजपची दुसरी खेळी राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यावरून स्पष्ट झाली आहे. महापालिकेच्या तोंडावर उत्तर भारतीय उमेदवाराला विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर मराठी मतदारांना खेचण्यसाठी भाजपनं ‘मराठी कट्टा’ सुरू केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी मतदार भाजपशी जोडला जाण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय मुंबईत आशिष शेलार, अतुल भातखळकरांसारखे आक्रमक चेहेरे भाजपकडे आहेत, जे मराठी मतदारांना वळवतील.

भाजप आणि मनसेची जवळीक

मनसेच्या इंजिनवर भाजपचं कमळ विराजमान झाल्यावर भाजपच्या ‘मिशन’ मुंबई एक्स्प्रेसला वेग येण्याची आणि शिवसेनेला शह देण्याची रणनिती आहे. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब घरी जाऊन राज ठाकरे यांची भेटही घेतली आहे. शिवाय भाजपला मनसेच्या मराठीच्या मुद्द्याचाही फायदा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणं हाही याच रणनितीचा भाग असल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय आहे भाजपचं मिशन मुंबई महापालिका? 

मुंबई महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखलं जातं. कारण देशाचं आर्थिक हब मुंबई आहे. ज्या राजकीय पक्षाची मुंबई महापालिकेवर पकड त्याचं पारडं नेहमी जड मानलं जातं. म्हणूनच भाजप मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी ‘मिशन मुंबई महापालिका’ सुरु केलंय. नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद देऊन त्यांना शिवसेनेला भिडण्यासाठी पुढे करण्यात आलंय. म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून पहिल्यांदा राज्यात आल्यानंतर नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्र थेट मुंबईतून सुरू केली. त्यावेळी राणेंनी मुंबईत येताच मुंबई महापालिका येत्या काळात काबीज करण्याचा दावा करत शिवसेनेला ओपन चॅलेंज दिलं. त्यामुळे यावेळी भाजनं तायरी तर जोरदार केलीय पण शिवसेना आणि महाविकास आघाडीला शह देण्यात भाजप किती यशस्वी ठरेल हे येणारा काळच ठरवेल.

Ajit Pawar ON ST Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजित पवार नेमकं काय म्हणाले ?

PM MODI On Corona Variant | नव्या कोरोना व्हेरिएंटची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल

Rajesh Tope | दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्यांसाठी RTPCR टेस्ट करणे बंधनकारक; राजेश टोपेंची माहिती

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.