Eknath Shinde Interview: एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे कारागृहात का टाकणार? एकनाथ शिंदे म्हणाले, ‘त्यांनी ती संधी…’

Eknath Shinde Exclusive Interview: आम्ही विकास करत आहे. त्यामुळे त्यांना हे फतवे काढावे लागले, असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीसाठी उलेमांनी काढलेल्या फतव्यासंदर्भात घेतला. बॅग तपासणीरुन उद्धव ठाकरे सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या बॅग तपासल्या. आम्ही गवगवा केला आहे.

Eknath Shinde Interview: एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे कारागृहात का टाकणार? एकनाथ शिंदे म्हणाले, 'त्यांनी ती संधी...'
Eknath Shinde
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 5:33 PM

Eknath Shinde Exclusive Interview: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपणार आहे. त्यावेळी महायुतीचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही ९ मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली. त्यात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. प्रचार सभांमधून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कारागृहात टाकण्याची भाषा करत आहे, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. उद्धव ठाकरे मला कारागृहात टाकण्याचे वक्तव्य करत असले तरी त्यांना ती संधी मिळणार नाही.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या. महिला, शेतकरी, युवकांसाठी योजना सुरु केला. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले. महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. सर्वसामान्य लोकांसाठी आमच्या ११ योजना आहेत, त्या सर्व योजनांची चौकशी उद्धव ठाकरे करणार आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे करत आहे. परंतु आम्ही गरीबांसाठी योजना केल्या आहे. त्यासाठी मला जेलमध्ये टाकणार असतील तर मी कशासाठी घाबरणार आहे. आता जनता आमच्यासोबत आहे. ते उद्धव ठाकरे यांना ती संधी मिळणार नाही. कारण आम्ही विकास केला आहे. लोक विकासाला मतदान करणार की घरी बसणाऱ्या लोकांना मतदान करणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते आम्ही दिले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवण्याची संधी मिळणार नाही. महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

त्यांच्या बॅगमध्ये हिंदुत्वाला विरोध

लोकांना आपल्या कुटुंबाचे चरितार्थ चालवण्याची भ्रांत आहे. आम्ही विकास करत आहे. त्यामुळे त्यांना हे फतवे काढावे लागले, असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीसाठी उलेमांनी काढलेल्या फतव्यासंदर्भात घेतला. बॅग तपासणीरुन उद्धव ठाकरे सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या बॅग तपासल्या. आम्ही गवगवा केला आहे. कारण आमच्या बॅगमध्ये सकारात्मक आहे. त्यांच्या बॅगमध्ये नकारात्मक आहे. त्यांच्या बॅगमध्ये हिंदुत्वाला विरोध आहे. खरं तर त्यांना बॅगा लागत नाही. त्यांना कंटनेर लागतो, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.