‘दिवसभरात बलात्काराच्या 3 घटना, मुख्यमंत्री महोदय, मोगलाई फोफावतेय’, चित्रा वाघ कडाडल्या

"मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या राज्यात? ही शिवशाही नाही तर मोगलाई फोफावत आहे", अशा शब्दात चित्रा वाघ कडाडल्या आहेत (Chitra Wagh on rape cases in Maharashtra).

'दिवसभरात बलात्काराच्या 3 घटना, मुख्यमंत्री महोदय, मोगलाई फोफावतेय', चित्रा वाघ कडाडल्या
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 8:16 PM

मुंबई : राज्यात एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरवर जाब विचरला आहे. “मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या राज्यात? ही शिवशाही नाही तर मोगलाई फोफावत आहे”, अशा शब्दात चित्रा वाघ कडाडल्या आहेत (Chitra Wagh on rape cases in Maharashtra).

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

“कोल्हापूरात गर्भवती महिलेवर सामुहीक बलात्कार, औरंगाबादमध्ये ही सामुहीक बलात्काराची घटना, वाशिम मध्येही चालत्या खाजगी बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आजच्या एका दिवसातल्या या तीन घटना आहेत. मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात. ही शिवशाही नाही, ही तर मोगलाई फोफावतेय”, असं चित्रा वाघ म्हणाल्या (Chitra Wagh on rape cases in Maharashtra).

कोल्हापुरात गर्भवती महिलेवर बलात्कार

कोल्हापुराच्या रायगड कॉलनीत एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला आसामवरून गुंगीचे औषध देऊन कोल्हापूरात आणले. महिलेच्या मर्जीविरुद्ध पीडितेशी संबंध ठेवल्याचा तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून संशयितांचा शोध सुरु आहे.

औरंगाबादेत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत वाराणसीहून आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी वाराणसीवरुन आपल्या नातेवाईकांसोबत औरंगाबादेत आली होती. पण ही तरुणी रस्ता चुकली त्यामुळे तिची आणि नातेवाईकांची भेट होत नव्हती. त्यावेळी तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा घाटी रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाशिममध्ये 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडलीय. चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडली. संबंधित तरुणीवरील बलात्काराची घटना 6 जानेवारीला घडलीय. या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार समोर आला आहे.

आरोपीने पीडित तरुणीला सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन  बलात्कार केला. तसंच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

याप्रकरणी  पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली असून संबंधित आरोपी समीर देवकर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

संबंधित बातमी : धक्कादायक! गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले बलात्कार

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.