अमित ठाकरेंनी हात उचलल्याचा आरोप, मनसेच्या दोन गटांमध्ये तणाव, नवी मुंबईत काय घडतंय?

नवी मुंबईत मनसेच्या दोन गटांमध्ये टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. माथाडी कामगारांनी आज दुपारी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर आता मनसे कार्यकर्ते नवी मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड आक्रमक झाले.

अमित ठाकरेंनी हात उचलल्याचा आरोप, मनसेच्या दोन गटांमध्ये तणाव, नवी मुंबईत काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 8:14 PM

रवी खरात, नवी मुंबई, Tv9 मराठी | 9 जानेवारी 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात अतिशय टोकाचा कलह बघायला मिळतोय. मनसेचे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. आपण कामगारांची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेंनी आपल्यावर हात उचलला, असा दावा महेश जाधव यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर नवी मुंबईत वातावरण तापलं होतं. महेश जाधव यांच्या समर्थकांनी मनसे कार्यकर्त्यांमा पळवून-पळवून मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्ते हातात रॉड घेऊन नवी मुंबईच्या रस्त्यावर दाखल झाले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. या घडामोडी पाहता परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झालाय.

“माथाडी कामगारांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलं आहे ही बाईट आधी थांबवा. जर परत महाराष्ट्रात कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला एकट्याला धरला तर घरात घुसून पळवू. ते आज भेटले नाहीत तरी उद्या-परवा भेटतील”, असं मनसे कार्यकर्ते कॅमेऱ्यासमोर म्हणाले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. वाद होऊ नये, यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

योगेश चिले यांचा महेश जाधवांवर गंभीर आरोप

मनसेकडून महेश जाधव यांची मनसे मराठी कामगार सेनेच्या अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच मनसे नेते योगेश चिले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महेश जाधव अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते, असा आरोप योगेश चिले यांनी केलाय. तसेच अमित ठाकरेंनी महेश जाधव यांना कामगारांपासून वाचवलं असंही योगेश चिले म्हणाले. महेश जाधव यांना वाचवून सुद्धा ते अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत बोलत आहेत. पण राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याविरोधात बोलाल तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा योगेश चिले यांनी दिलाय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.