ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसच्या कार्यालयात, थेट…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे प्रचारात अतिशय व्यस्त आहेत. ते प्रचंड गडबडीत आहेत. पण असं असताना त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न काल एका तरुणाकडून करण्यात आला. यामुळे शिंदे काल प्रचंड संतापले.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीचं मतदान आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या, महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून प्रचार करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे प्रचारात अतिशय व्यस्त आहेत. ते प्रचंड गडबडीत आहेत. पण असं असताना त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न काल एका तरुणाकडून करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड संतापले. त्यांना राग इतका आला की थेट काँग्रेसच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले, अशी माहिती आहे. पण ज्याने त्यांचा ताफा अडवत गद्दार, गद्दार म्हणून घोषणा दिला त्या तरुणाने आज ठाकरे गटात प्रवेश केला.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल रात्री ताफा अडवण्याचा प्रयत्न एका तरुणाकडून करण्यात आला होता. संतोष कटके नावाच्या व्यक्तीने एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला होता. यानंतर संतोष कटके यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती आहे. संतोष कटके यांनी मुंबईत साकीनाका परिसरात एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला होता. तसेच गद्दार, गद्दार म्हणूनही घोषणा दिल्या होता. संतोष कटके यांच्या या कृत्यानंतर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जावून जाब विचारला.
ताफा अडणारे संतोष कटके यांची प्रतिक्रिया काय?
संतोष कटके यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “जे गद्दार आहेत, त्यांना गद्दार बोलणारच. ज्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली, आमच्या उद्धव साहेबांनी त्यांना एवढं मोठं पद दिलं होतं. त्यांच्यासोबत त्यांनी गद्दारी केली. त्या गद्दारांना गद्दारच बोलणार. काही नाही माझी इच्छा होती गद्दारांना गद्दार बोलणार अशी ती इच्छा मी पूर्ण केली”, अशी प्रतिक्रिया संतोष कटके यांनी दिली.
“मी याआधी कोणत्याही पक्षात नव्हतो. आज माझा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाला. मला उद्धव ठाकरे यांना भेटून खूप छान वाटलं. उद्धव ठाकरे यांनी मला पाठीवर थाप मारली. मला पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे त्यांचा खूप खूप आभारी आहे”, अशी भावना संतोष कटके यांनी व्यक्त केली.