‘महाराष्ट्रातील संपूर्ण दुःख होळीमध्ये जळून खाक होऊ दे’, मुख्यमंत्र्यांनी होलिका दहन करत दिल्या शुभेच्छा

तमाम महाराष्ट्रातील जनतेला होळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील संपूर्ण दुःख या होळीमध्ये जळून खाक होऊ द्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत.

'महाराष्ट्रातील संपूर्ण दुःख होळीमध्ये जळून खाक होऊ दे', मुख्यमंत्र्यांनी होलिका दहन करत दिल्या शुभेच्छा
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 10:48 PM

मुंबई : “होळी पौर्णिमेनिमित्त ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या होलीकोत्सवात सहभागी होत मनोभावे पूजन केले. जळणाऱ्या अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात व्हावेत आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना केली. राज्यातील नागरिकांना होलिकोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संपूर्ण राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचं सांगितलं.

“होळीचा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक उत्साहान साजरी करत असतात. तमाम महाराष्ट्रातील जनतेला होळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील संपूर्ण दुःख या होळीमध्ये जळून खाक होऊ द्या. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंद भरभरून वाहू द्या, हीच इच्छा व्यक्त करतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“जनतेच्या जीवनामध्ये विविध रंग उधळू द्या, हीच इच्छा मी व्यक्त करतो. सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे रंग तमाम महाराष्ट्रातील नागरिकांच्या चरणी येऊ हीच प्रार्थना करतो. संपूर्ण जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन धुळवड साजरी करतात. पर्यावरण पूर्वक होळी साजरी करावी असं आव्हान मी महाराष्ट्रातील जनतेला करतो. रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरावे. पर्यावरण पूरक ही होळी संपूर्ण नागरिकांनी साजरी करावी असा आवाहन मी नागरिकांना करतो”, असं देखील शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांना दिला मोलाचा संदेश

“जिथे-जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तिथे-तिथे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. मात्र पुढे त्यांनी बोलताना चांगली सद्धबुद्धी मिळावी आणि त्यांना शुभेच्छा असं खरमरीत वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?.
उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या...
उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या....
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?.
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य.
'पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद', राऊतांच्या दाव्यानं खळबळ
'पवारांचे 5 खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद', राऊतांच्या दाव्यानं खळबळ.
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.