गुवहाटीला जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हाच आमचा अजेंडा…

आमची श्रद्धा आहे. आम्ही भक्तिभावाने जात आहे. आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत.

गुवहाटीला जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हाच आमचा अजेंडा...
गुवहाटीला जाता जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हाच आमचा अजेंडा... Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 9:48 AM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला निघाले आहेत. विशेष विमानाने ते गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण जात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरूनच आम्ही गुवाहाटीला जात आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच देवीला राज्याच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीचं साकडं घालणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार जात आहे. श्रद्धेने जात आहे. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असं वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आमची श्रद्धा आहे. आम्ही भक्तिभावाने जात आहे. आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत. राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही. आम्ही भक्तीभावाने जात आहोत, असंही ते म्हणाले.

तसेच काल दलित पँथरचे नेते कोल्हापुरात भेटले. दलित पँथरचे नेते सुखदेव सोनावणे यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, स्पेशल विमानाने आमदार आणि खासदार गुवाहाटीला जात आहेत. एकूण 180 जण विमानात आहेत. हे सर्व जण आज दुपारी साधारण 12 वाजेपर्यंत गुवाहाटीत उतरतील. त्यानंतर दुपारी ते देवीचं दर्शन घेतील.

एक दिवस ते गुवाहाटीत राहतील. त्यानंतर ते उद्या संध्याकाळी हे आमदार आणि खासदार पुन्हा राज्यात परततील, असं सांगितलं जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.