AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : डान्स करताना स्टेजवरच 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, CM चषकातील घटना

मुंबई: भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित CM चषक स्पर्धेदरम्यान, मंचावर डान्स करताना एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या स्पर्धेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र डान्स करत असताना ही मुलगी मंचावरच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अनिशा शर्मा असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. मुंबईच्या कांदिवलीतील लालजी पाडा इथं मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला […]

VIDEO : डान्स करताना स्टेजवरच 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, CM चषकातील घटना
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

मुंबई: भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित CM चषक स्पर्धेदरम्यान, मंचावर डान्स करताना एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या स्पर्धेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र डान्स करत असताना ही मुलगी मंचावरच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अनिशा शर्मा असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. मुंबईच्या कांदिवलीतील लालजी पाडा इथं मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

सध्या राज्यभरात विविध ठिकाणी सीएम चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कांदिवलीतील लालजी पाडा इथंही स्थानिक भाजप नगरसेवक कमलेश यादव यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा 23 नोव्हेंबरपासून सुरु आहे. काल या स्पर्धेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी अनिसा शर्मा मंचावर नृत्य सादर करत होती.

मात्र, ती नाचत असताना  अचानक स्टेजवर कोसळली. नेमकं काय घडलं हे क्षणभर उपस्थितांना कळलं नाही. त्यानंतर उपस्थितांनी मुलीला तातडीने  जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. या मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं असं नगरसेवक कमलेश यादव म्हणाले.

मृत अनिशा शर्मा ही कांदिवली भागातच राहणारी होती. ती सातवी इयत्तेत शिकत होती. तिला डान्सची आवड होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.