मनसुख हिरेनप्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्यामागे काळंबेरं, आम्ही पोलखोल करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. (cm uddhav thackeray slams bjp over mansukh hiren death case)

मनसुख हिरेनप्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे देण्यामागे काळंबेरं, आम्ही पोलखोल करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 4:49 PM

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मात्र हा तपास जर एनआयएकडे देण्याचा डाव असेल तर त्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. आम्हीही या प्रकरणाचा कसून तपास करून सर्व काही बाहेर काढू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला. (cm uddhav thackeray slams bjp over mansukh hiren death case)

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. हिरेन मनसुख प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. यंत्रणा कुणाची मक्तेदारी नसते. सरकार येतात, जातात. यंत्रणा आहे तिथेच असतात. यंत्रणांवर विश्वास असावा लागतो. तुमच्या काळात ज्या यंत्रणा होत्या त्याच आताही आहे. मग आताच अविश्वास का? असा सवाल करतानाच हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा डाव असेल तर त्यात नक्कीच काळंबेरं आहे. आम्हीही या प्रकरणाचा खोलापर्यंत तपास करून सर्व काही बाहेर काढू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला

डेलकर प्रकरणी कुणालाही सोडणार नाही

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरूनही विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. जे लोक काल सत्तेत होते. मुख्यमंत्री होते, त्यांना राज्याच्या यंत्रणांवर विश्वास नाही. आणि डेलकर यांच्या कुटुंबीयांनी मात्र मला भेटून राज्याच्या यंत्रणेवर विश्वास दाखवला आहे. डेलकर प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डेलकर यांनी त्यांच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात आत्महत्या करावी हे त्या राज्यासाठी लांच्छनास्पद आहे. त्यांच्या सुसाईड नोटममध्ये काही लोकांचा उल्लेख आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येईल. कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा देणारच, असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय

विरोधकांकडून ऊठसूठ महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. राज्यातील यंत्रणांवर अविश्वास दाखवला जात आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रात यंत्रणाच नाही. सर्व काही केंद्र सरकारच्याच हाती आहे असं जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी इंधन दरवाढीचा विषयही केंद्राकडेच द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. (cm uddhav thackeray slams bjp over mansukh hiren death case)

संबंधित बातम्या:

Maharashtra Budget women : महिलांचे नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, 12 वीपर्यंत मुलींना मोफत प्रवास

Maharashtra Budget 2021: हे तर BMC चं बजेट, ठाकरे सरकारला पेट्रोल-डिझेलवर बोलण्याचा अधिकारच नाही : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Budget 2021 : मद्यावरील व्हॅटमध्ये 5 टक्क्यांनी वाढ, काय महाग काय स्वस्त?

(cm uddhav thackeray slams bjp over mansukh hiren death case)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.