Bhandup mall fire : भांडूप आगप्रकरणाची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची मागितली माफी

भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. (CM Uddhav Thackeray visit Bhandup hospital after fire kills 10; BMC orders probe)

Bhandup mall fire : भांडूप आगप्रकरणाची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची मागितली माफी
डेटाबॉम्ब घेऊन देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे गेले होते.
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 1:30 PM

मुंबई: भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची आर्थिक मदत करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. (CM Uddhav Thackeray visit Bhandup hospital after fire kills 10; BMC orders probe)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भांडूपमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना संकटामुळे तात्काळ उपचारासाठी राज्यात रुग्णालये आणि कोविड सेंटर उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याली हे मॉलमधलं हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोव्हिड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती. येत्या 31 तारखेला संपत होती. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या दुकान, तळमजल्यांना आग लागली. ती हॉस्पिटलपर्यंत आली. जे कोरोना रुग्ण अॅडमिट होते, त्यातील बाहेर काढताना काहींचा मृत्यू झाला. अशा घटना झाल्यानंतर आपण जागे होतो, चौकशी होते… या प्रकरणातही चौकशी करुन कारवाई करु… कमला मिलमध्येही आग लागली होती. त्यावेळी अनेकांचे प्राण गेले होते. त्यामुळे अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून कोव्हिड सेंटर, जम्बो फॅसिलिटी सेंटरमधील स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोविड सेंटर, रुग्णालये ज्या इमारतीत आहेत, त्या संपूर्ण इमारतीचंच फायर ऑडिट करण्याच्याही सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. या रुग्णालयात काही लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यांचाच या दुर्घटनेत अधिक मृत्यू झाला आहे. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणं किंवा त्याचा निर्णय घेणं कठिण असतं. मात्र, या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयांकडे मी दिलगिरी व्यक्त करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख

या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यात दिरंगाई, दुर्लक्ष झालं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे आपण मॉल, सेंटर्समधील वर्दळीवर बंधनं आणली असल्याचंही ते म्हणाले. (CM Uddhav Thackeray visit Bhandup hospital after fire kills 10; BMC orders probe)

संबंधित बातम्या:

Bhandup Hospital Fire | भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील भीषण 11 तासांनी आटोक्यात, 10 जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

भांडूप मॉलमधील आग निष्काळजीपणातून, हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार: हेमंत नगराळे

Bhandup Fire: ड्रीम्स मॉलच्या रुग्णालयाला OC आणि अग्निशामन यंत्रणा नव्हती, मृतांचा आकडा वाढला

(CM Uddhav Thackeray visit Bhandup hospital after fire kills 10; BMC orders probe)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.