Mumbai Coastal Road: नवीन वर्षांत मुंबईकरांना मोठे गिफ्ट, 40 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला अवजड वाहनांना बंदी असणार आहे. त्यामुळे या ठिकणी ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड वाहने आणि मालवाहतुकीस बंदी असणार आहे. परंतु बेस्ट आणि एसटी बसेस किंवा खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनांना प्रवेश असणार आहे.

Mumbai Coastal Road: नवीन वर्षांत मुंबईकरांना मोठे गिफ्ट, 40 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत
Coastal Road
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 9:45 AM

Mumbai Coastal Road: मुंबईतील पायाभूत सेवा मजबूत करण्याचे काम गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मुंबईत लोकसेवेनंतर मेट्रो प्रकल्पाचे जाळे तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच रस्ते मार्ग अधिक मजबूत करण्याकडेही पावले उचलली आहे. त्यासाठीच सागरी किनारा मार्गावरील (कोस्टल रोड) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता हाजी अली ज्यूस सेंटर ते वरळी नाक्यापर्यंतची आंतरबदल मार्गिका क्रमांक २ दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने सुरू केली. त्यामुळे या रोडवरील हाजी अली ते वांद्रे-वरळी सी लिंकदरम्यानच्या आठपैकी सहा आंतरबदल मार्गिका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अगदी 40 मिनिटांचा प्रवास 10 ते 15 मिनिटांत होणार आहे.

कोस्टल रोडचे 95 टक्के काम पूर्ण

कोस्टल रोडच्या कामास गेल्या काही दिवसांत विलंब झाला होता. आता त्या कामाला आता गती मिळाली आहे. कोस्टल रोडच्या उर्वरित दोन मार्गिकाही लवकरच सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कोस्टल रोडचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. राहिलेली कामे म्हणजे काँक्रिटकीरण, विद्युत खांबाची उभारणी यासह इतर तांत्रिक कामे दोन आठवड्यात पूर्ण होतील. येत्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अंतिम टप्पा सेवेत आणण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचा आहे. या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच संपूर्ण रस्ता टोलमुक्त असणार आहे.

कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. यात अनेक ठिकाणी आंतरबदल मार्गिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वळसा न घालता इच्छितस्थळी पोहोचता येईल.

हे सुद्धा वाचा

अवजड वाहनांना असणार बंदी

कोस्टल रोडला अवजड वाहनांना बंदी असणार आहे. त्यामुळे या ठिकणी ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड वाहने आणि मालवाहतुकीस बंदी असणार आहे. परंतु बेस्ट आणि एसटी बसेस किंवा खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनांना प्रवेश असणार आहे.

असा सुरु झाला कोस्टल रोड

  • 11 मार्च 2024 रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह 9.29 किमी. दक्षिणवाहिनी मार्गिका.
  • 10 जून 2024 रोजी मरीन ड्राईव्ह ते लोटस जंक्शन 6.25 किमी उत्तरवाहिनी मार्गिका.
  • 11 जुलै 2024 रोजी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडणारी मार्गिका.
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?.
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?.
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका...
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका....
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.