राजकारण करण्याचे दिवस नाहीत; पुढील आठ दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे: राजेंद्र शिंगणे
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे निष्काळजी करू नका. (Coming week very critical for maharashtra, says rajendra shingane)
मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे निष्काळजी करू नका, असं सांगतानाच हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत. राज्यासाठी आगामी आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, अशी चिंता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली आहे. (Coming week very critical for maharashtra, says rajendra shingane)
राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही चिंता व्यक्त केली आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरवरून राजकारण होतंय. मी यावर काही बोलणार नाही. हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत, असं सांगतानाच पुढील आठ दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं शिंगणे म्हणाले.
ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला नाही
गोंदियामध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत. मी स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. त्या रुग्णालयात ऑक्सिजन शिल्लक होता. त्यामुळे चुकीचे आरोप करण्यात काही अर्थ नाही. नालासोपारा येथेही ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला नाही. आम्ही नियोजन करत असतानाच अचानक काही ठिकाणी रुग्ण वाढतात. त्यामुळे आमचे नियोजन होत नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. तसेच प्रत्येकाला लस मिळावी म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही इतर देशातून लस आणण्याचे प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात काल 398 रुग्ण दगावले
महाराष्ट्रात काल (16 एप्रिल) 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. राज्यात सध्या 6 लाख 38 हजार 034 सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37 लाख 03 हजार 584 झाली आहे. राज्यात काल 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 1.61% इतका झालाय. कालच्या दिवसात 45 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 30 लाख 04 हजार 391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 35 लाख 14 हजार 181 जण होम क्वारांटाईन आहेत, तर 25 हजार 168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू दर वाढला
राज्यात आज 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. तर राज्यातील मृत्यू दर 1.61% एवढा झालाय. तसेच राज्यात आज 45,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झालेय. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत, तर सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Coming week very critical for maharashtra, says rajendra shingane)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 17 April 2021 https://t.co/hBKkoOClJy #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2021
संबंधित बातम्या:
“ठाण्यात आदमी 1, इंजेक्शन 2, नागपुरात आदमी 2, इंजेक्शन 1, हेवीवेट मंत्र्याकडून बहुत नाइंसाफी”
आरोग्य यंत्रणेची नामी शक्कल, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची थेट कोव्हिड टेस्ट (Coming week very critical for maharashtra, says rajendra shingane)